शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीतील क्लब नशा हुक्का पार्लरला ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:15 IST

‘लोकमत’ ने मांडला होता प्रश्न : पालिका कारवाई करत असतानाही होती तरुणांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोना काळात सर्व नियम धाब्यावर बसवून गर्दी जमवणाऱ्या क्लब नशा हुक्का पार्लर महापालिकेने सील केला आहे. त्याठिकाणी पोलिसांनी तीनदा कारवाई करूनही हुक्का चालक पोलिसांना जुमानत नव्हता. त्यामुळे शहरात हुक्का पार्लर डोकेदुखी ठरत असल्याचे ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत असलेल्या नवी मुंबईत हुक्का पार्लर संस्कृती रुजत आहे. त्याला वेळीच अटकाव घातला जात नसल्याने तरुणाई नशेच्या आहारी जात आहे. अशातच शहरात कोरोनाचा प्रभाव असतानाही हुक्का पार्लर सुरू ठेवून त्याठिकाणी गर्दी जमवली जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यानुसार शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी हुक्का पार्लरवर कारवाईचा धडाका लावला आहे. परंतु पोलिसांच्या कारवाईनंतर काही मिनिटातच पुन्हा त्याठिकाणी गर्दी जमत होती. यावरून हुक्का पार्लर चालकांवर कायद्याचा धाक नसल्याचे दिसून येत होते.

त्याचप्रमाणे एपीएमसीमधील क्लब नशा या हुक्का पार्लर चालकांकडूनदेखील सर्व नियम पायदळी तुडवत तरुणांची गर्दी जमवली जात होती. याबाबत सोमवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन महापालिकेच्या पथकाने सोमवारी संध्याकाळी त्याठिकाणी पाहणी केली. यावेळी मोठ्या संख्येने तरुण हुक्का ओढत बसल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर राखले जात नव्हते. त्यानुसार सातत्याने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेने या हुक्का पार्लरवर कारवाई करून ते सील केले आहे. तीन दिवसांपूर्वीच सीबीडी येथेदेखील एका हुक्का पार्लरवर कारवाई झाली होती. पालिकेने अशाचप्रकारे कारवाईचा धडाका सुरू ठेवल्यास हुक्का चालकांच्या मुजोरीला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी