शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
2
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
3
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
4
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
7
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
8
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
9
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
10
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
11
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
12
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
13
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
14
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
15
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
16
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
17
सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
18
बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले
19
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
20
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी माथाडी कामगारांचा बंद; बाजार समितीमधील व्यवहार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 06:46 IST

शासनाने २४ डिसेंबरला आयोजित केली बैठक

नवी मुंबई : शासनाकडे १५ वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी माथाडी कामगारांनी सोमवारी लाक्षणिक बंदचे आयोजन केले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले हाेेते. शासनाने २४ डिसेंबरला विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीमध्ये प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा आंदाेलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने बंदचे आयोजन केले हाेते. कामगारांचे अनेक प्रश्न १० ते १५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाकडून प्रत्यक्षात प्रश्न सोडविण्याऐवजी फक्त आश्वासने दिली जात असल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून १४ डिसेंबरला राज्यव्यापी बंदचे आवाहन केले होते. मुंबई बाजार समितीच्या कांदा, बटाटा, भाजी, फळ, मसाला व धान्य मार्केटमधील व्यवहार ठप्प होते. माथाडी भवनसमोर कामगारांचा मेळावा घेण्यात आला. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित केले हाेते. कोरोना काळात कामगारांना विमा संरक्षण देण्यात यावे. रेल्वेचा पास देण्यात यावा. माथाडी बोर्डावर पूर्णवेळ अध्यक्ष व सचिवांची नियुक्ती करण्यात यावी. रेल्वे यार्डात सुविधा मिळाव्या, बोर्डामध्ये माथाडी कामगारांच्या मुलांना नोकरी देण्यात यावी, अशी मागणी माथाडी नेेते नरेंद्र पाटील यांनी केली.कामगारांच्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी २४ डिसेंबरला विशेष बैठकीचे आयोजन करण्याचे लेखी पत्र देण्यात आले आहे. यामुळे बेमुदत बंद मागे घेण्यात आला आहे. बैठकीत प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई व्यतिरिक्त नाशिक, कोल्हापूर, पुणे, सातारा परिसरातही कामगारांनी आंदोलन केले.आवक आली जावक बंद माथाडी कामगारांनी बंदचे आयोजन केल्यामुळे पाचही मार्केटचे व्यवहार बंद होते. कृषिमाल पाठविणाऱ्या काहींना बंदविषयी माहिती नसल्यामुळे त्यांनी माल विक्रीसाठी पाठविला होता. दिवसभरात पाच मार्केटमध्ये २०८ वाहनांची आवक झाली. परंतु मार्केटमधून किरकोळ मार्केटमध्ये माल गेला नाही.शासनाकडे १५ वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी बंदचे आयोजन केले होते. राज्य सरकारने प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीमध्ये प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल.- नरेंद्र पाटील, माथाडी नेते

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती