शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मसाला व्यापाऱ्यांचा बंद

By admin | Updated: June 22, 2016 02:18 IST

नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईला विरोध करण्यासाठी मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सोमवारी लाक्षणिक बंदचे आयोजन केले होते. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईला विरोध करण्यासाठी मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सोमवारी लाक्षणिक बंदचे आयोजन केले होते. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. साखर व नारळ व्यापाऱ्यांनी दिवसभर व्यापार सुरूच ठेवला होता.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. अतिक्रमण हटविताना विरोध करणाऱ्या ३१ व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांनी एक दिवसाच्या लाक्षणिक बंदचे आयोजन केले होते. या बंदमध्ये पालिकेने कारवाई केलेल्या डी विंगसह इतर मसाला व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. परंतु साखर व नारळ व्यापारी आंदोलनामध्ये सहभागी झाले नाहीत. यामुळे शंभर टक्के मार्केट बंद ठेवण्यात मसाला व्यापाऱ्यांना अपयश आले आहे.महानगरपालिकेने सुरू केलेल्या कारवाईविरोधात व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली आहे. सोमवारी सील केलेल्या काही गाळ्यांचे सील काढण्यास अनुमती दिली आहे. मंगळवारी पुन्हा या याचिकेवर सुनावणी होणार आहे. व्यापाऱ्यांनी अचानक केलेल्या बंदविषयी बाजार समिती परिसरामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. अतिक्रमण वाचविण्यासाठी व्यापारी दबावतंत्राचा वापर करत असून अशा प्रकारे नागरिकांना वेठीस धरू नये, असे मत व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)