शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिडको वसाहतींतील २९९१ पथदिवे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:46 IST

नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष; पनवेल महापालिकेचे सिडकोला पत्र

- वैभव गायकरपनवेल : पनवेल महापालिकेत समाविष्ट सिडको नोडमधील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. हस्तांतराच्या नावाखाली सिडकोने विविध कामांकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. त्यातच नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार पनवेल महापालिकेत समाविष्ट सिडको नोडमधील विविध वसाहतींमध्ये तब्बल २९९१ पथदिवे बंद असल्याची माहिती समोर आली आहे.पनवेल महापालिकेत समाविष्ट खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, खांदा वसाहत, तळोजे पाचनंद, कामोठे, आसूडगाव, पनवेल स्थानक रस्ता, आसुडगाव, काळुंद्रे, तक्का आदीचा यात समावेश आहे. पनवेल महापालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने ७ नोव्हेंबर २०१९ रोजी सिडको नोडमधील विविध विभागातील पथदिव्यांची संयुक्त पाहणी केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे.विशेष म्हणजे, महापालिका क्षेत्रातील रहिवासी वारंवार सिडकोकडे तक्रारी करीत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेने सर्व्हे केलेल्या काही ठिकाणी चोऱ्यांचे प्रकारही घडले आहेत. सिडको महामंडळाच्या वतीने विकासकामांवर कोट्यवधींचा निधी खर्च केला जात आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली सिडको वसाहतीमध्ये हजारो कोटींची विकासकामे सिडकोच्या मार्फत सुरू आहेत. पादचाऱ्यांना अंधारातूच मार्गक्रमण करावे लागत आहे, अशा वेळी एखाद्या वेळेला रात्री अपरात्री अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे पालिकेच्या उपायुक्तांनी सिडकोच्या मुख्य अभियंत्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे.पालिकेच्या स्थापनेपासून सिडको वसाहतीमधील विविध विकासकामे असो वा पालिकेने हाती घेतलेल्या कामासंबंधी ना हरकत दाखला असो, सिडकोमार्फत पालिकेची अडवणूक केली जात आहे.पनवेल पालिकेतील नगरसेवकांनी सिडको वसाहतीत नगरसेवक निधीतून हाती घेतलेल्या कामांना सिडको ना हरकत दाखला देत नसल्याने अनेक कामे प्रलंबित आहेत. सिडको कागदी घोडे नाचवून वेळ मारून नेण्याचे काम करीत असल्याचा आरोप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केला आहे. या प्रकरणी सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातंबे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.सिडको नोडमधील अनेक पथदिवे बंद आहेत. पनवेल महापालिकेने केलेल्या सर्व्हेनुुसार, विभागनिहाय आकडेवारीची माहिती सिडकोच्या विद्युत विभागाला पत्राद्वारे दिली आहे.- डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त, पनवेल महापालिका