शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणात नंबर आला; आतापर्यंत मिळाले ५६ कोटी! माझी वसुंधरा अभियानात २४ कोटींची पारितोषिके

By योगेश पिंगळे | Updated: February 20, 2024 22:40 IST

महाराष्ट्र राज्यात नेहमीप्रमाणेच पहिले स्थान कायम राखले

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीपासूनच उल्लेखनीय कामगिरी केली असून, सन २०२०-२१ पासून महाराष्ट्रात पहिला क्रमांक, तर राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक संपादन केला आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेस पुरस्कारापोटी आतापर्यंत ५६ कोटी एवढी रक्कम जाहीर झालेली असून, आणखी काही पारितोषिक रक्कम जाहीर होणे बाकी आहे. स्वच्छ सर्वेक्षणाप्रमाणेच माझी वसुंधरा अभियानातही नवी मुंबईने उल्लेखनीय यश संपादन केले असून, २४ कोटी इतकी रक्कम पारितोषिकापोटी महानगरपालिकेस प्राप्त झाली असल्याचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने देशात स्वच्छ शहरांमध्ये द्वितीय (तांत्रिकदृष्ट्या तृतीय) क्रमांकाचे मानांकन प्राप्त केले असून, महाराष्ट्र राज्यात नेहमीप्रमाणेच पहिले स्थान कायम राखले आहे. शहराचे सर्वोच्च 'सेव्हन स्टार' मानांकन नवी मुंबई शहराने प्राप्त केले असून, हे मानांकन प्राप्त करणाऱ्या देशातील केवळ दोन शहरांमधील नवी मुंबई हे एक शहर असून, राज्यातील एकमेव शहर आहे. मागील वर्षी नवी मुंबईला फाईव्ह स्टार मानांकन प्राप्त झाले असून, यावर्षी 'सेव्हन स्टार' मानांकन प्राप्त झालेले आहे. हागणदारीमुक्त शहरांच्या ओडीएफ कॅटेगिरीत नवी मुंबई शहराने 'वॉटरप्लस' हे सर्वोच्च मानांकन कायम राखले आहे. 'माझी वसुंधरा' अभियान सन २०२३ मध्ये 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत राज्यात 'क' वर्ग महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईने पर्यावरणशील शहराचे प्रथम मानांकन प्राप्त केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या पारितोषिक रकमांचा विनियोग नागरी सुविधा पुरविण्यासाठी केला जात असून, यामधून नवी मुंबईच्या स्वच्छता, सुशोभीकरण व पर्यावरणात लक्षणीय काम करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त नार्वेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई