अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवली
कल्याण-डोंबिवलीमधील एका बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीत सुमारे 4क् लाख रुपयांची रोकड आढळून आल्याने निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली होती. त्यानुसार, निवडणुकीच्या धामधुमीत नेमकी ही रक्कम कोणाची, कुठून आली, याबाबत शहरामध्ये तर्कवितर्काला उधाण आले होते. मात्र, त्या प्रकरणाची शहानिशा करून संबंधित बांधकाम व्यावसायिकाला आयकर विभागाने क्लीन चिट दिल्याची माहिती डोंबिवली विधानसभा निवडणूक अधिकारी जयराम देशपांडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
या प्रकरणाची सखोल चौकशी करूनच हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित व्यावसायिकाला बोलवून त्यास ती रक्कम देण्यात येणार असल्याचेही देशपांडे म्हणाले. सध्या या घटनेतील ती रक्कम निवडणूक कार्यालयाच्या कल्याण मुख्यालयातील कस्टडीत सुरक्षितपणो ठेवली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण घडल्यावर प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकत्र्यासह जिल्ह्यात प्रचंड चर्चा झाल्याने व्हॉट्सअॅपवर याबाबतच्या मेसेजेसला उधाण आले होते. त्या बिल्डरच्या मते ही रक्कम एका प्रकल्पानिमित्त कराव्या लागणा:या रजिस्ट्रेशनसाठी घेऊन जात असल्याचेही सांगण्यात आले. दुपारच्या वेळेत एका चारचाकी गाडीतून ते स.वा. जोशी महाविद्यालयाच्या परिसरातून जात असताना निवडणूक भरारी पथकासह रामनगर पोलीस ठाण्याच्या स्क्वॉडने ही गाडी तपासणीसाठी अडवली होती. त्या वेळी गाडीच्या मागील आसनावर ही रक्कम आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरार्पयत याबाबतची चौकशी सुरू असल्याचे निवडणूक अधिका:यांनी स्पष्ट केले होते. चौकशी सुरू असल्याने तूर्तास तरी ही रक्कम ताब्यात घेतल्याचे सूत्रंनी आधी स्पष्ट केले होते.