मुंबई : नागरी परिसरात असलेल्या नगरपालिका व महापालिका क्षेत्रातील वन क्षेत्राचे लोक सहभागातून वन व्यवस्थापन करण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. नागरी क्षेत्रात वने व वनेतर क्षेत्रावर परिसर विकासाची कामे करण्यासाठी उपवनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापण्याचा आदेश त्यांनी दिला.या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय उद्यान तसेच अभयारण्य वगळता सर्व प्रकारच्या वनांचा समावेश करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, स्वायत्त संस्था, अशासकीय संस्था आणि पर्यावरण तज्ज्ञ यांच्या सहकार्याने नागरी परिसरातील वनक्षेत्र आणि वनेतर पडीक क्षेत्रावर वनोपजाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांच्या धर्तीवर नागरी क्षेत्रातील वनांचे संरक्षण व व्यवस्थापन करण्यासाठी नागरी समिती स्थापन करण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)
लोकसहभागातून नागरी वन संरक्षण
By admin | Updated: August 6, 2015 01:29 IST