शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सोसायट्यांमध्ये ओल्या कच-यापासून खतनिर्मिती प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:34 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी घराघरात जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी घरामध्येच ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासोबतच

नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी घराघरात जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी घरामध्येच ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासोबतच अनेक मोठ्या सोसायट्या व हॉटेलच्या आवारातच ओल्या कच-यापासून खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यासही सुरुवात झाली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच उद्यानातही पानाफुलांच्या हरित कचºयापासून खतनिर्मिती करण्यासाठी कंपोस्ट पिट्स उभारण्यात आले असून, वेळोवेळी याठिकाणी पाहणी केली जात असून प्रत्यक्षात या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद नोंदविला जात आहे. अत्याधुनिक स्वरूपाच्या यंत्रणेद्वारे ओल्या कचºयापासून खतनिर्मितीचा अद्ययावत प्रकल्प लुब्रीझॉल कंपनीने उभारला असून महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी स्वत: या आधुनिक प्रकल्पाला भेट देऊन तेथील कार्यपद्धतीची पाहणी केली. कंपनीच्या उपाहारगृहात दररोज निर्माण होणाºया साधारणत: २८ किलो ओल्या कचºयावर या अत्याधुनिक यंत्रात प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जाते. या खताचा वापर करून उद्योग समूहाच्या ३७ एकर परिसरात ठिकठिकाणी फुलविलेल्या बागा, हिरवळ आच्छादित जागा विकसित करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी ठरावीक अंतरावर मोसमी फुलांचे ताटवे तयार करून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. या मोसमी फुलांमुळे परिसराचे रूप बदलून जाते हे बघून प्रभावित होत आयुक्तांनी अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र सुशोभित दिसावे व शहर सौंदर्याला झळाळी लाभावी याकरिता शहरात विशिष्ट दर्शनी जागांवर मोसमी फुले लावावीत अशा सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या.सानपाडा येथील मिलेनियम टॉवर बी टाईपमध्ये तेथील रहिवाशांनी जागरूकता दाखवली असून, ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करणारे अत्याधुनिक यंत्र बसविले आहे. अत्यंत कमी जागा लागणारी व प्रभावीपणे कचºयापासून खतनिर्मिती करणारी ही यंत्रणा ओल्या कचºयाचे क्र शिंग करून वेगाने खतनिर्मिती करते. या खताचा वापर सोसायटीतील १००हून अधिक फ्लॅटधारक आवारातील उद्यान सुशोभीकरणासाठी वापरतात. मोठी लोकवस्ती असलेल्या मिलेनियम टॉवर डी टाइपमधील ३३६ फ्लॅटधारकांनी सोसायटी आवारात कंपोस्ट पिट्सद्वारे खतनिर्मिती प्रकल्प उभा केला आहे.