शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शहरात गांजा विक्रीच्या अड्ड्यांवर धाडसत्र

By admin | Updated: July 30, 2016 04:40 IST

अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांनी नवी मुंबईमध्ये नेरूळ, तुर्भे नाका, इंदिरानगर, एपीएमसी, कोपरखैरणे, वाशी परिसरामध्ये दुकाने सुरू केली आहेत. ‘लोकमत’च्या टीमने

नवी मुंबई : अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांनी नवी मुंबईमध्ये नेरूळ, तुर्भे नाका, इंदिरानगर, एपीएमसी, कोपरखैरणे, वाशी परिसरामध्ये दुकाने सुरू केली आहेत. ‘लोकमत’च्या टीमने या अड्ड्यांवर खुलेआम गांजा विकला जात असल्याचे उघडकीस आणताच अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व पोलीस निरीक्षक माया मोरे यांनी एपीएमसीजवळ धाड टाकून गांजाची झाडे ताब्यात घेतली आहेत. या रोपांची लागवड करणाऱ्या पप्पू साजीद खानला अटक केली. एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये गांजा विक्री करणाऱ्यांनी तेथून पळ काढला असून तेथील विक्री बंद झाली आहे. तुर्भे इंदिरानगरमध्ये यापूर्वी गांजा विक्री करणारी पानटपरी तेथून हलविण्यात आली आहे. पोलिसांनी यापूर्वी गांजा विकणाऱ्या पाच ते सहा जणांना ताब्यात घेवून चौकशी केली असता एपीएमसीमधील राजू नावाची व्यक्ती तेथे गांजा विकत असल्याचे तपासात पुढे आले आहे. नेरूळ सेक्टर २४ मध्ये बालाजी टेकडीच्या पायथ्याशी गांजा विक्रीचा मोठा अड्डा होता. महाविद्यालयीन तरुण येथून गांजा खरेदी करत होते. पोलिसांनी पहाटेच या झोपडीवर धाड टाकली. येथे गांजा विक्री करणारी महिला शोभा मोहन गोपीला अटक करून २३० ग्रॅम गांजा जप्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. शहरात इतरही ठिकाणी कुठे गांजा किंवा इतर अमली पदार्थांची विक्री होत आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)शहरात खळबळ खुलेआम सुरू असलेल्या गांजा विक्रीचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन प्रसिद्ध करताच शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गांजा विक्रीच्या अड्ड्यांवर धाडी टाकून दोघांना अटक करून नेरूळ व एपीएमसीमध्ये गुन्हे दाखल केले. याठिकाणची गांजाची रोपे व २३० ग्रॅम गांजाही जप्त केला असून इतर आरोपींचाही शोध सुरू आहे. ‘लोकमत’चे मानले आभार नेरूळमध्ये नागरी वस्तीमध्ये गांजा विक्री होत होती. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गांजा घेण्यासाठी येथे तरुण येत होते. वारंवार भांडणे होत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच पोलिसांनी धाड टाकून हा अड्डा बंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.