शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शहरात जनसायकल योजनेंतर्गत ४५ स्टॅण्ड उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:41 IST

शहरातील नागरिकांनी कमी अंतराच्या प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर टाळावा, तसेच तसेच पर्यावरणाला पूरक असलेल्या सायकलींचा वापर करून व्यायामही व्हावा, यासाठी महापालिकेने खासगी संस्थेच्या मदतीने जनसायकल प्रणाली सुरू केली आहे.

नवी मुंबई : शहरातील नागरिकांनी कमी अंतराच्या प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर टाळावा, तसेच तसेच पर्यावरणाला पूरक असलेल्या सायकलींचा वापर करून व्यायामही व्हावा, यासाठी महापालिकेने खासगी संस्थेच्या मदतीने जनसायकल प्रणाली सुरू केली आहे.शहरातील अनेक नागरिक कामानिमित्त नवी मुंबईतील विविध भागांसह उरण, जेएनपीटी आणि खारघर आदी ठिकाणी ये-जा करण्यासाठी खासगी वाहनांचा वापर टाळत पालिकेच्या जनसायकल प्रणालीतील सायकलींचा वापर करीत आहेत. सायकल योजनेतील स्टॅण्डची संख्या ४५ पर्यंत नेण्यात आली असून सुमारे ३५0 हून अधिक सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.वाशी येथे ५ आणि सानपाडा येथे दोन सायकल स्टॅण्ड सुरू करण्यात आले असून या भागातदेखील आणखी सायकल स्टॅण्ड आणि सायकलींची मागणी वाढली आहे.पालिकेच्या या प्रणालीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता यावा, यासाठी वाशीपर्यंत स्टॅण्डची निर्मिती करण्यात आली असून वाशीपासून ऐरोलीपर्यंतही सायकली उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.२१ व्या शतकातील शहर म्हणून संबोधले जाणारे नवी मुंबई शहर पर्यावरणशील शहर म्हणून विकसित होण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक समस्येला पर्याय म्हणून कमी अंतरासाठी खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा व सायकलसारखे प्रदूषणमुक्त पर्यायाला प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने महापालिकेने जनसायकल प्रणाली सुरू केली आहे. शहरातील नागरिकांनीही या योजनेला पसंती दिली आहे.पहिल्या टप्प्यात नेरुळ आणि सीवूड येथील विविध सात ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या सायकल स्टॅण्डची संख्या सानपाडा वाशीपर्यंत ४५ वर नेण्यात आली आहे. या सायकलींचा वापर प्रामुख्याने व्यायाम करण्यासाठी केला जात असून सकाळच्या वेळी स्टॅण्डवर असलेल्या सायकली अपुऱ्या पडतआहेत.वाशी ते ऐरोली भागातील नागरिक, सोसायट्या, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून सायकलींचे स्टॅण्ड निर्माण करण्याची मागणी महापालिकेकडे केली जात आहे. नागरिकांची मागणी आणि उत्साह पाहता टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात सायकलींच्या स्टॅण्डचे जाळे पसरविण्यात येणार असून सायकलींची संख्यादेखील वाढविण्यात येणार आहे.सीबीडीत लवकरच नवीन स्टॅण्डनेरु ळ, सीवूड, सानपाडा आणि वाशी भागात सुमारे ४५ हून अधिक सायकल स्टॅण्ड सुरू करण्यात आले आहेत. वाशीपासून पुढील भागात ऐरोलीपर्यंत स्टॅण्डची निर्मिती करण्यात येणार आहे.सीबीडीमध्येही अद्याप सायकल स्टॅण्ड बनविण्यात आले नसल्याने या नोडमध्ये लवकरच जनसायकल योजनेतील स्टॅण्ड बनविण्यात येणार आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई