शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पहाटे सहा वाजल्यापासूच नवी मुंबईत शहर स्वच्छता; आयुक्तांचे प्रशासनास निर्देश

By नामदेव मोरे | Updated: May 3, 2024 19:41 IST

स्वच्छतेमधील हलगर्जीपणा खपवून न घेण्याचा इशारा.

नवी मुंबई:  स्वच्छता अभियानातील मानांकन उंचाविण्यासाठी पहाटे सहा पासून शहर स्वच्छतेला सुरूवात करण्याचे आदेश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. शुक्रवारी पहाटे बेलापूर विभागाला अचान भेट देवून कामांची पाहणी केली. दिवसा संपूर्ण शहरात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेवून स्वच्छता आराखड्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. कामातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

स्वच्छता ही नवी मुंबई शहराची ओळख असून ती कायम टिकविण्यासाठी सातत्याने प्रयत्न आवश्यक आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. ८ विभाग कार्यालयांसाठी ८ नोडल अधिकारी नेमले असून त्या माध्यमातून प्रत्येक विभागाचे परीक्षण केले जात आहे. शहर स्वच्छतेचे काम सकाळी सहा वाजता सुरू करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत. याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी बेलापूर विभागाची पाहणी केली. ठरलेल्या वेळेत कामे झाली पाहिजेत. कोणत्याही स्थितीमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यालयात सर्व विभागांमधील कामांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. कचरा वर्गीकरणाची सुरुवात प्रत्येक घरापासूनच झाली पाहिजे. डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेगळा करावा लागू नये. कचरा संकलनासाठी विभागनिहाय सूक्ष्म नियोजन करून विभागनिहाय आराखडा आठ दिवसांत तयार करण्यास सांगितले.रिक्षा स्टँड, मार्केटमध्ये मुताऱ्या उपलब्ध करा. शहरातील रेड व यलो स्पॉटची पाहणी करण्यात यावी. रिक्षा, टॅक्सी स्टँड, मार्केटच्या ठिकाणी मुताऱ्या उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना केल्या. प्रत्येक शाळा, परिसर व तेथील शौचालय स्वच्छ असलेच पाहिजे. पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर नियमित कारवाई करण्यास सांगितले. हवा प्रदूषण रोखण्यावर विशेष लक्ष देण्यात यावे. बांधकामाचा कचरा रोडवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक विभागात वॉटर फॉगिंग व डिप क्लिनिंगवर भर देण्याच्या सूचनाही केल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शिरीष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई यांच्यासह सर्व विभाग अधिकारी उपस्थित होते. नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणारस्वच्छ सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका प्रत्येक वर्षी नावीन्यपूर्ण संकल्पना राबविते. थ्री आर सेंटर्स, थ्री आर ऑन व्हिल्स, फिशफेड, ड्रायवेस्ट बँक, ग्रीनसोल असे उपक्रम राबविले जात आहेत. ते अधिक गतिमान करून झिरो वेस्ट स्लम मॉडेलची व्याप्ती वाढवावी, अशा सूचनाही केल्या. नागरिकांचा सहभाग वाढविणारस्वच्छता सर्वेक्षणात यश मिळविण्यामध्ये नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असून त्यासाठी भर देण्यात येणार आहे. माझे शहर स्वच्छ राखण्यात मी १०० टक्के योगदान देईल ही भावना नागरिकांमध्ये वाढविण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई