शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंगच्या धान्यासाठी नागरिकांची पायपीट, घोटाळा उघडकीस आल्याचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 01:33 IST

Navi Mumbai News : लॉकडाउनच्या कालावधीत शासनाकडून नागरिकांना मोफत धान्य पुरविले जात होते. यावेळी घणसोली सिम्प्लेक्स येथील ४१४ क्रमांकाच्या शिधावाटप केंद्रात नागरिकांचे मोफत धान्य त्यांना न देता अपहार झाला होता.

 नवी मुंबई : घणसोली सिम्प्लेक्स परिसरातील नागरिकांना रेशनिंगच्या धान्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे. शिधावाटप केंद्रातील घोटाळा उघडकीस आल्यानंतर तिथले केंद्र विभागाबाहेर हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुन्हा त्याच चालकाकडे केंद्र सोपवून भ्रष्ट कारभाराची पोचपावती दिल्याचा आरोप नागरिक करत आहेत.लॉकडाउनच्या कालावधीत शासनाकडून नागरिकांना मोफत धान्य पुरविले जात होते. यावेळी घणसोली सिम्प्लेक्स येथील ४१४ क्रमांकाच्या शिधावाटप केंद्रात नागरिकांचे मोफत धान्य त्यांना न देता अपहार झाला होता. याबाबत तक्रारी प्राप्त होताच शिधावाटप विभागाने पाहणी केली असता, अपहार झाल्याचे उघड झाले. त्यानुसार, तत्काळ या केंद्राला टाळे ठोकण्यात आले. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ त्या ठिकाणी दुसरे केंद्र सुरू करणे आवश्यक होते. त्याऐवजी घणसोली सेक्टर ७ मधील रहिवाशांसाठी सेक्टर १ येथे नवे केंद्र करण्यात आले. यामध्ये सर्वसामान्यांची चांगलीच पायपीट होत आहे.विशेष म्हणजे नव्याने सुरू करण्यात आलेले केंद्र पूर्वी ज्या व्यक्तीमार्फत केंद्र चालविले जात होते, त्याच्याच स्वाधीन करण्यात आले आहे. शासकीय धान्यात अपहार झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्याला बगल देत, शिधावाटप विभागाने केवळ दुकानाला टाळे ठोकून नव्या ठिकाणी दुकान थाटण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे शिधावाटप विभागाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होत आहे, तर यामागे अर्थपूर्ण संबंध असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी, नागरिकांनी घोटाळा उघडकीस आणला, म्हणून त्यांनाच पायपीट करण्याची शिक्षा देण्याची भूमिका शिधावाटप विभागाने बजावल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई