शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
4
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
5
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
6
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
7
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
8
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
9
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
10
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
11
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
12
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
13
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
14
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
15
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
16
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
17
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
18
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
19
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट

पाणीटंचाईवर नागरिकांच्या सूचना

By admin | Updated: February 5, 2016 02:52 IST

नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणीटंचाईवर विचारविनिमय करण्यासाठी पनवेल नगरपालिकेच्या वतीने गुरूवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत

पनवेल : नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणीटंचाईवर विचारविनिमय करण्यासाठी पनवेल नगरपालिकेच्या वतीने गुरूवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पनवेलकरांनी विविध उपाययोजना सुचविल्या. त्याचबरोबर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सांगोपांग चर्चा पाणी परिषदेत करण्यात आली. नागरिकांच्या सूचना विचारात घेण्यात येतील अशी ग्वाही पालिकेच्या वतीने देण्यात आली.नगराध्यक्षा चारूशीला घरत, पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, बांधकाम सभापती राजू सोनी, आरोग्य सभापती मनोहर म्हात्रे, मुख्याधिकारी मंगेश चितळे, उपनगराध्यक्ष मदन कोळी आदी उपस्थित होते. सध्या वितरीत होत असलेले पाणी नागरिकांनी जपून वापरणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपालिकेने नियोजन केले आहे. त्यासाठी आतापर्यंत सात बैठका झाल्या असून पाण्याचे न्याय्य वाटप करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.मुख्याधिकारी मंगेश चितळे म्हणाले की, पनवेल शहराला प्रतिदिन देहरंग धरणातून ११ एमएलडी, एमजेपी कडून ९ एमएलडी, एमआयडीसी कडून ७ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मात्र जुन्या पाइपलाइनमुळे पाइप लाइन फुटते त्या दुरूस्तीसाठी शटडाउन घेतला जातो. त्यामुळे शहराच्या काही भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. धरणात पाणी मुळातच पाणी कमी असून १३१ दिवस पुरेल एवढे पाणी शिल्लक आहे. त्यासाठी पाणी जपून वापरणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्याकरिता पालिकेने नियोजन केले असून एसटीपी प्लॅन्ट सुरू केला आहे. हे प्रक्रि यायुक्त पाणी वापरास उपयोगात आणले तर पाण्याची मोठी बचत होईल. हा प्रश्न सोडविण्यासाठी कायमस्वरूपी योजनांमध्ये अमृत योजनेअंतर्गत कोटी रूपये निधी मंजूर झाला असल्याचे चितळे यांनी सांगितले. तात्पुरत्या योजनेत जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढविणे, विहिरीचा वापर, टँकर फिलिंग सेंटर, एसटीपी प्लॅन्टच्या पाण्याचा वापर असे उपाय योजण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. पाणीटंचाईसंबंधी आयोजित या परिषदेत पंढरीनाथ दळवी, रोहिणी लिमये, अरु ण भिसे , लक्ष्मी बातम व इतर अनेक नागरिकांनी सूचना केल्या. (वार्ताहर)