शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
2
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
3
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
4
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
5
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
6
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन
7
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
8
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
9
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
10
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
11
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
12
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
13
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
14
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
15
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
16
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
17
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
19
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
20
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...

जुन्या नोटांमुळे नागरिकांची उडाली त्रेधातिरपीट

By admin | Updated: November 11, 2016 03:40 IST

५०० तसेच १००० रुपयांच्या नोटा नाकारल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काळया पैशाला चाप बसविण्यासाठी राबविलेली ही योजना

प्राची सोनवणे, नवी मुंबई५०० तसेच १००० रुपयांच्या नोटा नाकारल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काळया पैशाला चाप बसविण्यासाठी राबविलेली ही योजना सर्वसामान्यांची मात्र डोकेदुखी ठरली आहे. गुरुवारी सकाळपासून बँका सुरु होण्यापूर्वीच नागरिकांनी परिसरात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले, तर तासनतास रांगेत उभे राहून दोन हजार रुपयांच्या कोऱ्याकरकरीत नोटेसह सेल्फी काढून सोशल मीडियावर अपलोड केले. गुरुवारपासून बँका व पोस्ट कार्यालयात जुन्या नोटा बदलून मिळणार असल्याने नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. दोन दिवस खिशात पैसे असूनही खर्चाची पंचाईत झाल्याने पाचशे आणि एक हजारच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी सकाळपासून बँकामध्ये एकच झुंबड उडाल्याचे दिसून आले. बँकातून एका वेळी केवळ चार हजार रुपये बदलून दिले जात होते, त्यामुळे किमान हात खर्चाची सोय म्हणून नागरिकांनी नोटा बदलण्यासाठी रांगा लावल्याचे पाहावयास मिळाले, तर अनेकांनी आपल्याकडीन जुन्या नोटा बँकेत जमा केल्या. आजचा संपूर्ण दिवस जुन्या नोटा बदलण्यात आणि बँकेत जमा करण्यात गेल्याने बाजारपेठा, हॉटेल्स तसेच किरकोळ दुकाने ओस पडली होती. दरम्यान, शनिवार आणि रविवारीही बँका चालू राहणार असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अनेकांनी आजच्या गरजेपुरत्या जुन्या नोटा बँकातून बदलून घेतल्या. उद्या नोटा बदलण्यासाठी पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे. दैनंदिन खर्चासाठी बड्या अधिकाऱ्यांनाही घ्यावे लागले कर्मचाऱ्यांकडून उधारनामवंत कंपनीचा कारभार सांभाळणारे त्या कंपनीचे मालक, अधिकारी, व्यवस्थापकही तेथील कर्मचाऱ्यांक डे सुट्या पैशांची मागणी करतानाची गमतीशीर बाब समोर आली आहे. एरव्ही खिशात ५००, १००० रुपयांच्या नोटा घेऊन फिरणाऱ्या या बड्या अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दैनंदिन गरजेसाठी लागणारी रक्कम कर्मचाऱ्यांकडून उधारीवर घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. रिअल इस्टेटमध्ये मंदीहजार, पाचशेच्या नोटा रद्द झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महिनाभर तरी रोखीचे व्यवहार होणार नसल्याने रिअल इस्टेट क्षेत्र मंदावणार असल्याचे भाकीत केले जात आहे. गॅस सिलिंडर न मिळाल्याने ग्राहकांमध्ये संतापघरोघरी गॅस सिलिंडर पोहोचवणाऱ्यांना महिलांचा रोष सहन करावा लागला. प्रत्येक घरात हीच परिस्थिती असल्यामुळे अखेर अनेक कर्मचाऱ्यांनी सिलिंडरची डिलेव्हरी देणेच बंद केले. काही ठिकाणी किरकोळ वादामुळे सिलिंडर परत न्यावे लागले.रुग्णालयात नोटा स्वीकारल्याने दिलासासर्वच रुग्णालये तसेच औषध दुकानांमध्ये ५००,१००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. जी खासगी रुग्णालये नोटा स्वीकारणार नाही अशांची तक्रार दाखल करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. चित्रपटगृहांकडे प्रेक्षकांची पाठ चित्रपटगृह प्रशासनाने ५०० तसेच १ हजार रु पयांच्या नोटा स्वीकारू नका, असे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. त्यामुळे वाशीतील रघुलीला मॉल, सिटी सेंटर मॉल तसेच खारघरमधील ग्लोमॅक्स, लिटील वर्ल्ड आदी मॉल्समध्ये सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळाला. नोटा बंद निर्णयामुळे चित्रपट व्यवसायाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चलनातील गोंधळाचा फटका शुक्र वारी आणि पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांनाही बसणार आहे. ‘३० मिनिट्स’ हा हिंदी चित्रपट तब्बल महिनाभर पुढे ढकलण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिणाममुबलक चलन उपलब्ध होईपर्यंत लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. यामुळे काही बाजार समित्या दोन दिवस, तर काही बाजार समित्या त्याहून अधिक काळ बंद राहण्याची शक्यता आहे. एका दिवसातच फळे आणि भाज्यांच्या दरात किरकोळ घसरण, भाज्यांच्या दरात सरासरी ६ ते ७ रु पयांची घसरण झाल्याचे निदर्शनास आले आहे. किरकोळ विक्रेत्यांनाही धंद्यात तोटा झाल्याने शहरातील विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आॅनलाइन पेमेंटला सुगीचे दिवससुटे पैसे नसल्यामुळे आपले व्यवहार अडू नयेत यासाठी अनेकांनी आॅनलाइन आर्थिक व्यवहाराकरिता अ‍ॅपचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आॅनलाइन आर्थिक व्यवहारांपासून चार हात लांब राहणारेही या पर्यायाचा वापर करत आहेत. पैसे भरून खर्चाची तरतूद करून ठेवली तर अनेकांनी अ‍ॅप कंपन्यांच्या रोख स्वीकारण्याच्या सुविधेचाही फायदा घेतला. पेटीमच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये वाढ, अशाच प्रकारची अनपेक्षित वाढ मोबिकविक या पेमेंट वॉलेटनेही नोंदविली आहे.आॅनलाइन शॉपिंग मंदावलीअ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलसारख्या ई-व्यापार संकेतस्थळांनी उत्पादन घरी पोहोचवल्यावर रोख रक्कम स्वीकारण्याचा पर्याय तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्लिपकार्टवर एक हजार रु पयांच्या पेक्षा कमी रकमेची खरेदी केल्यावर कॅश आॅन डिलिव्हरीचा पर्यायच उपलब्ध होत नसून पैसे भरण्यासाठी इतर पर्यायाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नोटा बदलताना घ्यावयाची काळजी :जुन्या नोटा २४ नोव्हेंबरपर्यंत बँका, तसेच पोस्ट आॅफिसमध्ये बदलता येतील. त्यासाठी ४००० रु पयांची मर्यादा आहे. २५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ दरम्यान ४ हजार रु पयांहून अधिक मूल्याच्या नोटा जमा करता येतील. त्यासाठी आधार, मतदान ओळखपत्र तसेच पॅन कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

 

नोटा जमा करावयाच्या असल्यास :जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत बँक तसेच पोस्ट आॅफिसमध्ये कोणत्याही मर्यादेशिवाय जमा करता येतील. ३१ डिसेंबर ते ३१ मार्चदरम्यान रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या बँका, कार्यालयात जमा करता येतील. त्यासाठी वैध बँक अथवा पोस्ट आॅफिस खाते येथे ओळखपत्र व प्रतिज्ञापत्र आवश्यक ठरेल.