शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे पालन करत वंडर्स पार्क खुले करण्याची नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:15 IST

लहान मुलांचा हिरमोड

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लॉकडाऊन काळापासून अद्याप नेरुळमधील महापालिकेचे वंडर्स पार्क बंद आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून घरीच असलेल्या लहान मुलांचे विरंगुळ्याचे ठिकाण बंद असल्याने चिमुकल्यांचा हिरमोड होत आहे. प्रशासन उदासीन असल्याचा आरोप नागरिक करत असून नियमांचे पालन करून वंडर्स पार्क खुले करावे, अशी मागणी केली जात आहे.

शासनाच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता देण्यात आली असून, सर्व व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्याने, थिएटर, नाट्यगृह यासारखी विरंगुळ्याचे ठिकाणे बंद ठेवण्यात आली होती, परंतु हळूहळू सर्वच खुले करण्यात आले आहे. नवी मुंबई शहरातील शाळा, महाविद्यालये अद्याप बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. अनेक लहान मुले गेल्या अनेक काही महिन्यांपासून घरी असून, कंटाळलेली आहेत. विविध खेळण्यांची सुविधा असलेले नेरुळमधील वंडर्स पार्क देखील अद्याप खुले करण्यात आलेले नाही, त्यामुळे लहान मुले आणि पालकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. नियमांचे पालन करण्यासाठी उपाययोजना करून वंडर्स पार्क सुरू करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

अनेक राइड्स नादुरुस्तn  वंडर्स पार्कमधील ऑक्टोपस, फेसबी, क्रिकेट यासारखी अनेक राइड्स नादुरुस्त असल्याने बंद आहेत. महापालिकेकडून नव्याने विविध अत्याधुनिक राइड्स बसविण्यात येणार होती; परंतु त्याबाबत कोणतीही प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई