शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर स्मारकासाठी नागरिक आक्रमक

By admin | Updated: January 26, 2017 03:38 IST

ऐरोलीतील रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामुळे शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पालिका आयुक्त तुकाराम

नवी मुंबई : ऐरोलीतील रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामुळे शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी जनतेने २६ जानेवारीला वाशी शिवाजी चौकात मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय राज्यघटनेने निर्माण केलेली लोकशाही व्यवस्था मोडीत काढली जात असल्याने प्रजासत्ताक दिनादिवशी मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बलचे आच्छादन करण्याचा निर्णय मार्च २०१६ च्या सर्वसाधारण सभेने घेतला होता. पण डोमला मार्बल लावणे योग्य होणार नसल्याचे कारण देवून पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १४ जुलैला हा प्रस्ताव रद्द केला. मार्बल न लावण्याचा निर्णय घेतल्याने पालिकेच्या खर्चात बचत झाल्याचे त्यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले होते. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. स्मारकाच्या खर्चात कपात केल्यास व मार्बल न बसविल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. काँगे्रसच्या नगरसेविका हेमांगी सोनावणे यांनी १६ आॅगस्टच्या सभेत लक्षवेधी सूचना मांडली. यावर चर्चा करताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करून मार्बलच बसविण्यात यावे अशा सूचना केल्या. सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्तांनीही मार्बल बसविण्याचे मान्य केले होते. पण प्रत्यक्षात यासाठीची कार्यवाही झालीच नाही. महापौर सुधाकर सोनावणे, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडे याविषयी पाठपुरावा केला होता. पण काहीही उपयोग झाला नसल्याने २६ जानेवारीला मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोळी आगरी महोत्सवासाठी १९ जानेवारीला ऐरोलीत आले होते. स्मारकाचे काम रखडल्याचे समजल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त करून आंदोलन उभारण्याच्या सूचना केल्या होत्या. यानंतर आंबेडकर स्मारक समितीने बैठका घेवून मूक निदर्शनाचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात विभागवार बैठका सुरू झाल्या आहेत. राज्यघटनेने तयार केलेल्या लोकशाही मूल्यांची नवी मुंबईत पायमल्ली होत असल्याने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन व प्रशासनास इशारा देण्यासाठी हे आंदोलन असून यानंतरही स्मारकाचे काम सुरू झाले नाही तर १० फेब्रुवारीपासून उग्र आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)