शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोची योजना; एक लाख घरांचा प्रस्ताव रखडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 04:05 IST

परिवहन केंद्रित विकास संकल्पनेवर सिडकोने सध्या ९५ हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे.

नवी मुंबई : सर्वसामान्यांसाठी ९५ हजार घरांची घोषणा केल्यानंतर सिडकोने तीन महिन्यांपूर्वी यात आणखी एक लाख दहा हजार घरांची भर घातली आहे. त्यामुळे पुढील चार वर्षांत तब्बल दोन लाख घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सिडकोने घेतला आहे. असे असले तरी नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या एक लाख दहा हजार घरांचा प्रस्ताव रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातील सत्ता परिवर्तनाचा या प्रकल्पाला फटका बसण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

परिवहन केंद्रित विकास संकल्पनेवर सिडकोने सध्या ९५ हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. चार टप्प्यांत या घरांची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी नऊ हजार घरांची गेल्या आठवड्यात सोडत काढण्यात आली आहे. या घरांच्या निर्मितीसाठी शहरातील रेल्वे स्थानकांचा फोर्ट कोर्ट एरिया, ट्रक टर्मिनल्स, बस डेपो आदी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर नव्याने जाहीर करण्यात आलेली एक लाख दहा हजार घरे शहरातील दगडखाणी, वॉटर पॉण्ड आदी पडीक व दुर्लक्षित जागेवर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावाला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हिरवा कंदील दाखविला होता. मात्र, आता राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे अद्यापि प्राथमिक स्तरावर असलेल्या एक लाख दहा घरांच्या प्रकल्पाबाबत नवीन सरकार काय निर्णय घेते, यावर या प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे.गृहबांधणीसाठी भरीव तरतूद९५ हजार घरांच्या निर्मितीसाठी सिडकोने तब्बल १९ हजार कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार सिडकोने या घरांच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील नऊ हजार घरांची सोडतही काढण्यात आली आहे. मागणीनुसार पुरवठा या धोरणानुसार घरासाठी नोंदणी घेऊन त्यानुसारच बांधकाम करण्याचे सिडकोने ठरविले आहे. मात्र, नव्याने जाहीर करण्यात आलेला एक लाख दहा हजार घरांचा प्रस्ताव अद्यापि कागदावरच असल्याचे समजते. आता या प्रकल्पाविषयी नवीन सरकार काय निर्णय घेते, याकडे सिडकोचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :cidcoसिडको