शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोचा वाहनतळ अवजड वाहनांना आंदण, सिडको, महापालिकेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 02:12 IST

नवी मुंबईत सिडकोने दिलेल्या जमिनींचा फार मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू आहे. वाशी सेक्टर ३० येथे तुंगा हॉटेल प्रा. लि. या हॉटेल साखळी चालविणाऱ्या व्यवस्थापनाला हॉटेल उभारण्यासाठी विस्तीर्ण असा भूखंड दिलेला आहे.

नवी मुंबई : वाशी येथील तुंगा हॉटेलच्या समोरील सिडकोच्या पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये मागील काही दिवसांपासून ट्रक, ट्रेलर व कंटेनर अशा अवजड वाहनांनी शिरकाव केला आहे. विशेष म्हणजे मागील अनेक दिवसांपासून ही वाहने एकाच जागेवर उभ्या असून, या प्रकाराला संबंधित विभागाचा अर्थपूर्ण पाठिंबा असल्याची चर्चा सुरू आहे. नवी मुंबईत सिडकोने दिलेल्या जमिनींचा फार मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू आहे. वाशी सेक्टर ३० येथे तुंगा हॉटेल प्रा. लि. या हॉटेल साखळी चालविणाऱ्या व्यवस्थापनाला हॉटेल उभारण्यासाठी विस्तीर्ण असा भूखंड दिलेला आहे. या हॉटेलसमोर सिडकोच्या मोकळ्या जागा आहेत. त्यातील आठ हजार चौरस मीटरची जमीन या हॉटेलला भाड्याने दिली. हॉटेलमध्ये येणाऱ्या वाहनांबरोबरच जनतेच्या वाहनांनादेखील या जागेत पार्किंग देण्याचे बंधनकारक करण्यात आले होते; पण हॉटेल व्यवस्थापनाने या जमिनीला रीतसर कुंपण घालून ही जागा त्यांचीच असल्याचा दिखावा तयार केला होता.त्याचबरोबर या ठिकाणी पार्किंगसाठी येणाऱ्या वाहनांना सिडकोच्या निर्धारित दरापेक्षा जास्त दर आकारला जात असल्याचे दिसून येत होते. या ठिकाणी पब्लिक पार्किंगला मज्जाव केला जात असल्याने या हॉटेलची मक्तेदारी असल्याचे चित्र होते. या हॉटेलच्या या मनमानीविरोधात वाशीतील समाजेसेवक संदीप ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर सिडकोच्या तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी तुंगा हॉटेलला दिलेली आठ हजार चौरस मीटर मोकळी जागा काढून घेतली होती. त्या जागेवर सर्वसामान्य वाहनधारकांसाठी पे अ‍ॅण्ड पार्क उभारले होते. परंतु, कोविडच्या आडून या पे अ‍ॅण्ड पार्कचा वेगळाच वापर सुरू असल्याचे दिसत आहे. खासगींना प्रवेश नाहीचसध्या या पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये अवजड वाहने तळ ठोकून उभी आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खासगी वाहनांना येथे प्रवेश मिळताना दिसत नाही. या प्रकाराला सिडको व महापालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.

टॅग्स :cidcoसिडकोParkingपार्किंग