शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोची आरोग्य सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 04:01 IST

सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोग्य सेवा पनवेल महापालिकेला सोमवारपासून हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागरी आरोग्य केंद्र, राष्ट्रीय नागरी आरोग्य केंद्र, हिवताप डेंग्यू कार्यक्रम व भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.

पनवेल : सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोग्य सेवा पनवेल महापालिकेला सोमवारपासून हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागरी आरोग्य केंद्र, राष्ट्रीय नागरी आरोग्य केंद्र, हिवताप डेंग्यू कार्यक्रम व भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे. यासंदर्भात पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची सिडको वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक पार पडली होती. त्या बैठकीत सिडकोच्या विविध सेवा टप्प्याटप्य्याने हस्तांतरित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता.पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीत यासंदर्भात हस्तांतरणाचा ठराव तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. मात्र विविध कारणास्तव हस्तांतरण लांबणीवर गेले होते. सध्याच्या घडीला हस्तातरामध्ये नागरी आरोग्य केंद्र , कुत्र्यांचे निर्बीजीकरण व हिवताप डेंग्यू कार्यक्र म आदीचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये घनकचरा हस्तांतरित करण्यात आलेला नाही. यासाठी लागणार खर्च पनवेल महानगर पालिका सिडकोला देणार आहे. हस्तांतरणाचा तीन महिन्याचा खर्च ३० लाखांच्या आसपास जाणार आहे. यामध्ये हिवताप डेंग्यूकरिता कार्यक्र माकरिता प्रत्येक महिन्यासाठी सुमारे २२ ते २३ लाख रु पये खर्च येणार आहे . कुत्र्यांचे निर्बीजीकरण प्रक्रि येसाठी ७ लाख २० हजार तसेच उर्वरित नागरी आरोग्य केंद्राच्या बाबतीत खर्चाची जबाबदारी थेट राज्य सरकार उचलत असते. यामुळे तीन महिन्यात पनवेल महानगर पालिकेला जवळजवळ ७० लाखांच्या आसपास खर्च याकरिता उचलावा लागणार आहे. सिडकोमार्फत नियुक्त करण्यात आलेला कंत्राटदारच पालिका हद्दीत ही सेवा देणार आहे. कंत्राटदारावर सिडको, पालिकेचे नियंत्रण असणार आहे.आरोग्य सेवक, सेविकेचा हस्तांतरणाला विरोधसिडकोच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या आरोग्य सेवक, सेविका यांच्या हस्तांतरणाला रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र विश्वनाथ पाटील यांनी विरोध दर्शविला आहे.पनवेल, उरण सिडको हद्दीतील द्रोणागिरी, करंजाडे, पुष्पकनगर याठिकाणची लोकवस्ती झपाट्याने वाढत असल्याने नव्याने कर्मचारी नियुक्त करण्याची गरज असताना सिडकोच्या माध्यमातून २३ कर्मचाºयांचे हस्तांतरण पालिकेकडे न करता पालिकेमार्फत नव्याने कर्मचारी नेमण्याची विनंती पाटील यांनी सिडकोच्या मुख्य आरोग्य अधिकाºयांकडे पत्राद्वारे केली आहे.नागरी आरोग्य केंद्र, हिवताप डेंग्यू कार्यक्र म तसेच कुत्र्यांचे निर्बीजीकरण आदींचा हस्तांतरण सोमवारपासून करण्यात आलेला आहे. याकरिता लागणारा खर्च पालिका उचलणार आहे. तीन महिन्यांनंतर नव्याने टेंडर काढून नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार असून कचरा हस्तांतरणाचा निर्णय देखील दोन ते तीन महिन्यात सोडविला जाईल.- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका

टॅग्स :cidcoसिडको