शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोची महागडी लॉटरी फसली? घरे परत करण्यासाठी ग्राहकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 08:08 IST

शिवजयंतीच्या मुहूर्तावर काढलेल्या संगणकीय सोडतीत पसंतीचे घर न मिळालेल्या १८८१ अर्जदारांना सिडकोने तळोजातील घरांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ग्राहकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पसंतीचे घर न मिळालेल्या ग्राहकांच्या माथी विक्रीविना पडून  असलेली तळोजातील घरे मारण्याचा आटापिटा सिडकोकडून सुरू आहे. त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करून अनेक ग्राहकांनी सिडकोने दिलेला पर्याय धुडकावून घरे सरेंडर करण्याचा धडाका लावला आहे. त्यासाठी सिडकोच्या संबंधित विभागात ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे. 

शिवजयंतीच्या मुहूर्तावर काढलेल्या संगणकीय सोडतीत पसंतीचे घर न मिळालेल्या १८८१ अर्जदारांना सिडकोने तळोजातील घरांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ग्राहकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

विशेष म्हणजे, ही घरे घ्यायची की नाही, याचा निर्णय संबंधित ग्राहकांनी घ्यायचा आहे. त्यासाठी संबंधित ग्राहकांना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. परंतु, अनेकांनी हा प्रस्ताव धुडकावून लावून तसे सिडकोला कळवले आहे. त्यामुळे विक्रीविना पडून असलेली घरे विकायची कशी? असा प्रश्न आता सिडकोसमोर उभा ठाकणार आहे. 

गुढीपाडव्याला पुन्हा सोडत?शिल्लक राहिलेल्या घरांसाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याचे समजते. कारण २६ हजार घरांसाठी केवळ २१ हजार ३९९ अर्जदारांनी अनामत शुल्क भरले होते. त्यापैकी १९,५१८ अर्जदारांना त्यांच्या पसंतीचे घर मिळाले आहे. म्हणजे या योजनेतील ६४८२ घरे विक्रीविना पडून आहेत. शिवाय कागदपत्रांच्या छाननीनंतर अनेक यशस्वी अर्जदार बाद होण्याची शक्यता आहे. ही बाब गृहित धरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिल्लक घरांसाठी नवीन सोडत काढण्याची योजना सिडकोत आखली जात असल्याचे समजते.

टॅग्स :cidcoसिडको लॉटरी