शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

द्रोणागिरी नोडच्या विकासावर सिडकोचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:53 IST

दहा वर्षांपासून दुर्लक्षित; पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी कसली कंबर

नवी मुंबई : विविध कारणांमुळे मागील एका दशकापासून दुर्लक्षित राहिलेल्या द्रोणागिरी नोडच्या विकासावर सिडकोने आता आपले लक्ष केंद्रित केले आहे, त्यानुसार या क्षेत्रात अत्यावश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर सिडकोने भर दिला आहे. त्यामुळे येत्या काळात द्रोणागिरी नोडला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सानिध्यात असलेल्या द्रोणागिरी नोडच्या विकासाबाबत सिडकोची भूमिका सुरुवातीपासूनच उदासीन राहिली आहे. मागील दहा वर्षांत सिडकोने आंतरराष्ट्रीय विमानतळ, ‘नैना’ प्रकल्प, मेट्रो व नेरुळ-उरण रेल्वे आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित केले, त्यामुळे द्रोणागिरी विकासाचा मुद्दा मागे पडला. विशेष म्हणजे, या प्रस्तावित नोडमध्ये साडेबारा टक्के योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. निविदा काढून अनेक भूखंडांची विक्री करण्यात आली आहेत. यात शैक्षणिक, सामाजिक, निवासी आणि वाणिज्य भूखंडांचा समावेश आहे. पायाभूत सुविधा नसल्याने या भूखंडांचा विकास होऊ शकला नाही. अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत पडून आहेत; परंतु सिडकोने आता द्रोणागिरीच्या विकासावर भर दिला आहे. पुढील वर्षभरात या विभागात पायाभूत सुविधांचे जाळे विणले जाणार आहे. तशा आशयाच्या सूचना लोकेश चंद्र यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. रस्ते, गटारे व अन्य पायाभूत सुविधांअभावी विकासकामे ठप्प पडली आहेत. अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. विकासकांनी महागड्या दराने घेतलेले भूखंड जैसे थे पडून आहेत, त्यामुळे गुंतवणूकदार आणि विकासकांवर दिवाळखोरीचे संकट ओढावले आहे. मात्र, सिडकोने आता या नोडच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्याने विकासक, गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.दोन हजार घरांचे प्रकल्पसिडकोने गेल्या वर्षी १५ हजार घरांची योजना जाहीर केली होती. यातील द्रोणागिरीच्या सेक्टर ११ आणि सेक्टर १२ मध्ये अनुक्रमे मल्हार आणि भूपाळी हे दोन गृहसंकुल उभे राहत आहेत. या दोन प्रकल्पात सुमारे दोन हजार घरे आहेत. या प्रकल्पांतील पात्रताधारकांना २0२0 मध्ये घरांचे वाटप करण्याची सिडकोची योजना आहे. त्यानुसार या विभागात आतापासूनच पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर सिडकोने भर दिला आहे.साडेबारा टक्के भूखंडवाटपाचे पुनर्नियोजनसाडेबारा टक्के योजनेतील चुकीच्या भूखंडवाटपामुळे द्रोणागिरीच्या विकास प्रक्रियेला फटका बसला आहे. वाटप झालेल्या अनेक भूखंडांना खारफुटीचा विळखा पडला आहे. तर काही भूखंड सीआरझेडमुळे बाधित झाले आहेत, त्यामुळे पूर्वी चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचे नव्याने वाटप करावे, तसेच प्रलंबित प्रकरणांचाही जलदगतीने निपटारा करावा, अशी येथील प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. या संदर्भात सिडकोने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

टॅग्स :cidcoसिडको