शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पायाभूत सुविधांची जबाबदारी सिडकोचीच; हस्तांतरणासाठी त्रिसदस्यीय समिती होणार स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 02:55 IST

: पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील सिडको नोडमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी सिडकोचीच असल्याचे महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कचरा हस्तांतरणाच्या मुद्यावरून मागील दोन दिवसांपासून सिडको कार्यक्षेत्रात निर्माण झालेली परिस्थिती निवाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पनवेल : पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील सिडको नोडमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी सिडकोचीच असल्याचे महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कचरा हस्तांतरणाच्या मुद्यावरून मागील दोन दिवसांपासून सिडको कार्यक्षेत्रात निर्माण झालेली परिस्थिती निवाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सिडकोने पनवेल महापालिका शहरातील कचरा उचलण्याची यंत्रणा महापालिकेकडे वर्ग केली आहे. त्यापोटी महापालिकेला ५३ कोटी रूपयांचे बिल पाठविले आहे. इतकेच नव्हे, तर गेल्या दोन दिवसांपासून महापालिका क्षेत्रातील कचरा उचलणे सिडकोने बंद केले आहे. दैनंदिन कचऱ्याची विल्हेवाट लावताना महापालिका प्रशासनाची तारांबळ उडत आहे. याचा परिणाम म्हणून महापालिका क्षेत्रात दोन दिवसांपासून ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचल्याचे आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पनवेलकरांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.सिडको कार्यक्षेत्रात पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी सिडकोचीच असल्याचे राज्य शासनाचे अवर सचिव अजित कवडे यांनी सिडकोला कळविले आहे. यासंदर्भात त्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांना २२ मार्च रोजी एक पत्र पाठविले आहे. पायाभूत सुविधा पनवेल महानगर पालिकेला हस्तांतरण करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया योग्य रितीने व्हावी, याकरिता सर्वसमावेशक धोरण आखणे आवश्यक आहे. त्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती स्थापण करण्याचे काम शासनस्तरावर सुरू आहे. या समितीत सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक, नवी मुंबई व पनवेल महापालिकांचे आयुक्त यांचा समावेश असणार आहे. यासंदर्भात ठोस निर्णय होईपर्यंत सिडको नोडसह महापालिका कार्यक्षेत्रात पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे या पत्राद्वारे सूचित केले आहे.महापालिका क्षेत्रातील सिडको नोडमधील साचलेल्या कचºयाच्या ढिगांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या वातावरणात कमालीचा उकाडा आहे. यातच रस्त्यावर ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचल्याने याचा नागरी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा फटका लोकप्रतिनिधींना बसत असून नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.- डॉ. अरूण भगत,आरोग्य सभापती,पनवेल महापालिका

टॅग्स :cidcoसिडको