शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत महत्त्वाचा ‘खांदेपालट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:15 IST

कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम : एकाच अधिकाºयावर विविध विभागाचा कार्यभार

- कमलाकर कांबळे

नवी मुंबई : सिडको व्यवस्थापनाने आपल्या विविध विभागांत लक्षणीय खांदेपालट केली आहे. आयएएस पदावर बढती मिळालेले अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी एस. एस. पाटील यांची सिडकोचे तिसरे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पणन, वसाहत आणि अनधिकृत बांधकाम विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर विद्यमान दोन सह व्यवस्थापकीय संचालकांचा भार कमी करण्यात आला आहे. अचानक करण्यात आलेल्या या खांदेपालटामुळे सिडको वर्तुळात तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोची ओळख आहे. सिडकोच्या माध्यमातून सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रोस विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात आहेत. रायगड जिल्ह्यात नवे शहर प्रस्तावित करण्यात आले आहे, त्यामुळे येत्या काळात सिडकोच्या कामाचा पसारा वाढणार आहे. त्यामुळेच आयएएस बढती मिळालेले अतिरिक्त जिल्हाधिकारी एस. एस. पाटील यांची सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील हे मागील तीन-साडेतीन वर्षांपासून अतिक्रमण विभागाचे मुख्य नियंत्रक म्हणून काम पाहत आहेत. आता त्यांच्यावर वसाहत-१, वसाहत-२ आणि वसाहत-३ तसेच पणन-१ आणि पणन-२ या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एसईझेडचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्यावरच सोपविण्यात आला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी १९ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या आदेशान्वये एस. एस. पाटील यांच्यावरील या जबाबदाºया निश्चित केल्या आहेत. विशेष म्हणजे, पणन, वसाहत तसेच अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग हे सिडकोचे महत्त्वाचे विभाग मानले जातात. सिडकोच्या कामकाजाची संपूर्ण भिस्त याच विभागावर आहे. या महत्त्वपूर्ण विभागाची जबाबदारी एकाच अधिकाºयावर सोपविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सिडकोत सध्या प्राजक्ता लवंगारे-वर्मा आणि अशोक शिनगारे हे दोन सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. प्राजक्ता लवंगारे यांच्याकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, कार्मिक तसेच वसाहत-३ या विभागाचा कारभार होता. आता त्यांच्याकडील वसाहत-३ हा विभाग काढून तो सिडकोतील तिसºया क्रमांकाचे सहव्यवस्थापकीय संचालक एस. एस. पाटील यांच्यावर सोपविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अशोक शिनगारे यांच्याकडील वसाहत-१ आणि वसाहत-२, पणन-१ आणि पणन-२ या विभागाचा कारभारही एस. एस. पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यांच्यावर सध्या साडेबारा टक्के या एकाच विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर प्राजक्ता लवंगारे यांच्यावर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना आणि कार्मिक विभागाचा कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे.

एकूणच दोन वरिष्ठ अधिकाºयांच्या अधिकारात कपात करून नव्याने रुजू झालेल्या अधिकाºयांवर महत्त्वाच्या जबाबदाºया सोपविण्यात आल्याने सिडकोतील अधिकारी व कर्मचाºयांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.किसन जावळे यांची बदली; पदभार स्वीकारण्यास टाळाटाळसिडकोतील अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य भूमी व भूमापन अधिकारी किसन जावळे यांची राज्य शासनाने तत्काळ बदली केली आहे. त्यांच्यावर आता सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या बदलीसंदर्भात २0 फेब्रुवारी रोजी शासकीय आदेश जारी करण्यात आले आहेत.विशेष म्हणजे या आदेशानुसार जावळे यांनी त्याच दिवशी आपल्याकडी जुना कार्यभार सोडून बदली झालेल्या पदाचा तत्काळ कार्यभार स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. मात्र जावळे हे अद्यापि त्याच पदावर कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :cidcoसिडको