शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत सिडकाे उभारणार ‘पंतप्रधान एकता मॉल’; राज्य सरकारकडून समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:18 IST

तीन महिन्यांत देणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विविध राज्यांमधील आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील  वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने एकाच छताखाली विकली जावीत, यासाठी ‘पंतप्रधान एकता मॉल’ची उभारणी केली जाणार आहे.  या मॉलची उभारणी नवी मुंबईच्या उलवेमध्ये  सिडकोमार्फत केली जाईल.

‘अनेकतेत एकता’ हा विचार समोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक राज्यात असा  एक माॅल उभारला जावा, असे निर्देश दिले होते. देशी उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी. त्यातून राष्ट्रीय एकात्मता साधली जाईल आणि आर्थिक विकासही साध्य होईल. स्थानिक कारागीर, व्यावसायिक आणि उद्योजक यांना हक्काचे व्यासपीठ मिळेल. हा पुढाकार ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांचा एक भाग आहे.

मॉलमध्ये देशाच्या राज्यांमधील उत्पादनांचा एक तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील उत्पादनांचा प्रत्येकी एक स्टॉल असेल. याच्या देखभालीसाठीचे धोरण राज्य सरकारची समिती तयार करेल. नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे समितीचे अध्यक्ष आहेत. सदस्यांमध्ये वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव आणि सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे सदस्य आहेत. उलवेमधील मॉलसाठी सिडकोने  ५२०० चौरस फूट जागाही निश्चित केली आहे.

देशभरातील कलावंत सादर करणार आपली कला

पंतप्रधान एकता मॉलच्या माध्यमातून पर्यटनालाही चालना मिळेल. मॉलच्या परिसरात सांस्कृतिक सभागृहांची उभारणी केली जाईल. देशभरातील कलावंत तेथे आपल्या कलांचे सादरीकरण करतील. मॉलमध्ये फूड कोर्टही असतील. मॉलच्या उभारणीसाठी केंद्र सरकार अर्थसहाय्य करणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई