शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक संस्थांकडून सिडकोच्या अटी शर्तीचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 05:32 IST

सुविधांपासून नागरिक वंचित; अल्पदरात भूखंड मिळवून साधला जातोय व्यावसायिक हेतू

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : नवी मुंबईचा विकास करताना सिडकोने विविध संस्था, संघटनांना अत्यल्प दरात विविध सुविधांसाठी भूखंड दिले आहेत. त्यामध्ये शैक्षणिक, क्रीडा तसेच आरोग्य व इतर सुविधांसाठी कार्य करणाऱ्या नामांकित संस्थांचा समावेश आहे. मात्र, सद्यस्थितीला या सर्व संस्थांकडून सिडकोच्या अटी व शर्तींचा भंग होत आहे.या संस्थांवर ठोस कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी सिडकोकडे केली आहे, अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचाही इशारा त्यांनी दिला. सिडकोने या संस्थांसाठी स्थानिकांना सुविधेत प्राधान्य देणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला त्याचा लाभ मिळावा आदी अटींचा समावेश केला आहे. मात्र त्याचा भंग करून संबंधित संस्था नफा कमतवत आहेत. भूखंड मिळवणाºया संघटनांमध्ये बहुतांश संघटना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष राजकीय व्यक्तींच्या आहेत. शिवाय अशा संघटनांनी प्रतिवर्षी सिडको व धर्मादाय आयुक्त कार्यालयाला अहवाल सादर करणे आवश्यक असतानाही तो सादर केला जात नसल्याचाही आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी केला आहे.सुविधांसाठी सवलतीच्या दरात भूखंड दिल्यानंतर संबंधित संस्थांकडून अटींचे पालन होत आहे का ? हे पाहण्यासाठी सिडकोची विशेष समिती गठीत केली आहे. मात्र, त्यांच्याही कार्यपद्धतीवर संशय असल्याचा आरोप केला जात आहे.शैक्षणिक, क्रीडा तसेच आरोग्य व इतर आवश्यक सुविधांसाठी सिडकोने संबंधित संस्थांना अल्पदरात भूखंड दिले आहेत. त्याकरिता सिडकोेने अटी व शर्ती घातल्या असून संबंधित संस्थांकडून त्याचे पालन होणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील शेकडो संस्थांकडून सद्यस्थितीला अटी व शर्तीचा भंग करून केवळ व्यावसायिक हेतू साध्य केला जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक सुविधांपासून वंचित राहत आहेत.- राजीव मिश्रा, तक्रारकर्तासामाजिक संस्थांना भूखंड दिल्यानंतर सामाजिक विभागामार्फत त्यांच्याकडून अटी शर्तीचे पालन होते का हे नियमित तपासले जाते. त्यानंतरही संस्थांकडून अटी शर्ती भंग होत असल्याची तक्रार आल्यास त्याची पडताळणी केली जाईल.- प्रिया रतांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको.

टॅग्स :cidcoसिडको