शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

विकासकामांना सिडकोचा खोडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:58 IST

पनवेल महानगर पालिकेत समाविष्ट असलेल्या सिडको नोडमधील विकासकामे करण्यासाठी सिडकोची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

- वैभव गायकर पनवेल : पनवेल महानगर पालिकेत समाविष्ट असलेल्या सिडको नोडमधील विकासकामे करण्यासाठी सिडकोची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, सिडकोमार्फत या विकासकामांना ना हरकत दाखला देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पालिकेची अनेक विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे विकासकामे करताना महापालिकेसमोर मोठा अडथळा निर्माण झाला आहे.पनवेल महापालिकेची १ आॅक्टोबर २0१६ रोजी स्थापना झाली. महानगर पालिकेत पूर्वाश्रमीची नगरपरिषद व २९ महसुली गावांसह खारघर, कळंबोली, तळोजा, नवीन पनवेल, कामोठे या सिडको नोडचा देखील समावेश करण्यात आला आहे. सिडकोमार्फत अद्याप हे नोड पालिकेकडे हस्तांतरित झाले नसल्याने सध्याच्या घडीला सिडकोमार्फतच याठिकाणी विविध सेवासुविधा पुरविल्या जात आहेत. खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल आदी सिडको नोडमधून लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक महापालिकेवर निवडून आलेले आहेत. आपल्या प्रभागातील विकासकामांच्या दृष्टीने नगरसेवक विविध विकासकामे करू इच्छित आहेत. याकरिता नगरसेवक स्वत:चा नगरसेवक निधी देखील यासाठी खर्च करण्यास तयार आहेत, परंतु सिडको नोडमधील विकासकामे करण्यापूर्वी सिडको प्रशासनाचा नाहरकत दाखला बंधनकारक आहे. सिडकोमार्फत हा दाखला देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अनेक विकासकामे रखडली आहेत. हस्तांतरणाचे कारण पुढे करीत सिडको पनवेल महानगर पालिकेला नाहरकत दाखला देत नाही. याचा परिणाम पालिका हद्दीतील विविध विकासकामांवर होत आहे. पनवेल महानगर पालिकेच्या स्थापनेपासून जवळजवळ ४0 पेक्षा जास्त विकासकामांच्या नाहरकत दाखल्यासाठी पालिका प्रशासनाने सिडकोसोबत पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र, सिडकोकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा नगरसेवकांचा आरोप आहे.खारघर शहरातील नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करून शहरातील एका विकासकामासाठी सिडकोकडून नाहरकत दाखला मिळविला आहे. याकरिता बाविस्कर यांना सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणात खेटा माराव्या लागल्या. विकासाच्या दृष्टीने अत्यंत सजग असणाऱ्या सिडको प्रशासनामार्फत हा एक प्रकारे विकासकामांमध्ये खोडा घालण्याचा प्रकार आहे.विशेष म्हणजे या विकासकामांमध्ये अनेक दुरु स्ती कामे, तसेच डागडुजीच्या कामांचा समावेश आहे. दरम्यान, यासंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व पालिकेचे आयुक्त यांच्या पातळीवर निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत आहे.>केवळएका कामाला परवानगीखारघर शहरातील नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करून शहरातील सेक्टर १५ मधील पुलाच्या डागडुजीच्या कामासाठी सिडकोकडून नाहरकत दाखला मिळविला आहे. अधिकाºयांना विनवणी करून सिडकोमध्ये वारंवार खेटे मारून त्यांनी या विकासकामाकरिता नाहरकत दाखला मिळविला आहे. हे एक काम सोडल्यास अनेक विकासकांच्या नाहरकत दाखल्यांची पालिकेला प्रतीक्षा आहे.>४0 पेक्षा जास्त कामांना सिडकोच्या नाहरकत दाखल्याची प्रतीक्षापनवेल महानगर पालिकेमार्फत नगरसेवक निधी, तसेच पालिकेमार्फत काढण्यात आलेल्या कामांना सिडकोच्या नाहरकत दाखल्यांची प्रतीक्षा आहे. सिडकोमार्फत परवानगी मिळाल्यास ही कामे मार्गी लागू शकतात. पालिकेमार्फत पत्रव्यवहार केलेल्या जवळजवळ ४0 कामांचा यामध्ये समावेश आहे.>पालिकेत समाविष्ट सिडको नोड अद्याप पालिकेकडे हस्तांतरित झालेला नाही, तर या विकासकामांसाठी नाहरकत दाखला सिडको कसा देणार? केलेल्या कामाची जबाबदारी कोणाची असेल ही देखील महत्त्वाची बाब आहे.- के. वरखेडकर,मुख्य अभियंता, सिडकोसिडको नोडमधील विकासकामांकरिता नगरसेवक निधीच्यामार्फत विविध विकासकामे काढण्यात आली आहेत. मात्र, सिडकोच्यामार्फत बºयाच कामांना नाहरकत दाखला मिळाला नाही. या कामांना सिडकोमार्फत नाहरकत दाखला मिळाल्यास अनेक विकासकामे मार्गी लागतील.- संजय कटेकर,शहर अभियंता, पनवेल महापालिका