शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

सिडको कॉलनींना मिळणार नवी झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:12 IST

२६८ कोटींच्या कामांना जोरदार सुरुवात; रस्ते, फुटपाथ आणि पावसाळी गटारांचा समावेश

- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या सिडको कॉलनी आहेत. त्या ठिकाणी २६८ कोटी रुपये खर्च करून सिडकोकडून विकास केला जाणार आहे. त्याकरिता निविदा प्रक्रि या पूर्ण होऊन कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्ते, फुटपाथ, पावसाळी गटारांची कामे केली जाणार आहेत, त्यामुळे नवीन वर्षात गैरसोयी कमी होण्यास मदत होणार असल्याचे मत सिडकोकडून व्यक्त करण्यात आले आहे.कळंबोली आणि नवीन पनवेल या दोन कॉलनी जुन्या आहेत. त्या ठिकाणी सिडकोने बांधलेले घरे आहेत. तसेच ३० वर्षांपूर्वी रस्ते, फुटपाथ आणि पावसाळी गटारे बांधण्यात आली आहेत. त्यांची काही ठिकाणी दुरवस्था असल्याकारणाने नागरिकांना त्रास होत होता. यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रस्त्यांमध्ये खड्डे पडले. पावसाळी नाल्यांमध्ये माती तसेच कचरा जाऊन बसल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचे दिसू लागले. फुटपाथही चालायला काही सेक्टरमध्ये राहिलेले नाहीत. कामोठे व नवीन पनवेल काही ठिकाणी हीच समस्या दिसू लागली आहे. याबाबत कळंबोली विकास समिती, सिटीझन युनिटी फोरम व एकता सामाजिक संस्था कामोठे, रोडपालीच्या राजा गणेशोत्सव मंडळाबरोबरच लोकप्रतिनिधी त्याचबरोबर राजकीय पक्षांनीही पाठपुरावा केला होता.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सिडको अध्यक्षपदाच्या काळात या महत्त्वाच्या सुविधांचा विकास करण्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याप्रमाणे आराखडा तयार करण्यात आला. त्यांना वरिष्ठ पातळीवरून मंजुरीही दिली गेली. कळंबोली, कामोठेकरिता अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे यांनी सर्व्हे करून विविध विकासकामांना चालना गेल्या वर्षभरात दिली. त्यामुळे लगबग २७५ कोंटींच्या कामांना मंजुरी मिळून कामाला सुरुवात झाली आहे. या कॉलनीमध्ये मोकळ्या भूखंडाला सरंक्षण कुंपण, उद्यानामधील वेगवेगळ्या दुरुस्ती केली जाणार आहेत.नवीन पनवेलला जोरदार कामे सुरूनवीन पनवेल कॉलनीमध्ये फुटपाथ आणि रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम जोरदारपणे सुरू आहे. पावसाळी गटारे नवीन करण्यात येत आहेत, तसेच फुटपाथही नवे करण्यास काम हाती सिडकोने घेतले आहे.च्अभ्युदय बँक ते एचडीएफसी बँक परिसरात कामे सुरू आहेत. लवकरच ते पूर्ण होतील त्यामुळे नवीन पनवेलचे रूप बदलणार असल्याचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खांदा कॉलनीतील रस्त्यांच्या व इतर कामांना सुरुवात होणार असल्याचे सभापती संजय भोपी म्हणाले.पडघे ते सीईटीपी रोडचे काम होणारफुटलॅण्ड - पडघे ब्रिजपासून तळोजा सीईटीपीकडे जाणाऱ्या रोडची दुरवस्था झालेली आहे. तो रस्ता १५ कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधणी केली जाणार आहे. त्याकरिता निविदा प्रक्रि या अंतिम टप्प्यात आहेत. नवीन वर्षात या महत्त्वाच्या व गर्दीच्या रोडच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.प्रक्रि या झालेल्या सांडपाण्याचा वापर होणारसिडको कॉलनीमधील सीईटीपी केंद्रांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रि या केली जाते, ते खाडीला सोडून दिले जाते. त्याचा पुनर्वापर करण्यासाठी सिडकोने पाऊल उचलले आहे, याकरिता स्वतंत्र पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. हे पाणी तळोजा एमआयडीसीला दिले जाणार आहे. १५० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. नवीन वर्षात या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले.नावडे, तळोजात कोट्यवधींची कामेनावडे, तळोजा या नवीन कॉलनीमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे सिडकोने सुरू केली आहेत. काही कामांना मंजुरी मिळाली आहे. या भागात रस्ते, गटारे, फुटपाथ करण्यात आलेला आहे. आता पम्पिंग हाउस तसेच नावडे येथे सहा कोटी रुपये खर्च करून होल्डिंग पॉण्ड बांधला जाणार आहे.सिडको वसाहतीत अनेक विकासकामे सिडकोने हाती घेतलेली आहेत. काही सुरू झाली आहेत तर काही काही दिवसांतच सुरू होतील, यामुळे नागरिकांना सोयसुविधा मिळणार आहेत. याकरिता मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. लवकरात लवकरच सर्व काम पूर्ण करून ते लोकार्पण केली जातील.- सीताराम रोकडे,अधीक्षक अभियंता, सिडकोसिडको कॉलनी विकासकाम (कोटींमध्ये)नवीन पनवेल ४०कळंबोली १७२कामोठे १०तळोजा २८नावडे १८एकूण २६८

टॅग्स :cidcoसिडको