शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

सिडको ३७७ हेक्टर जागेवर उभारणार नवीन पालघर शहर, आदर्श मॉडेलसाठी चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 07:33 IST

CIDCO News: प्रस्तावित नव्या शहरातील विकासाच्या संधी, बाजाराची स्थिती आदींचा आढावा घेण्याच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचारविनिमय करून विकासाचे एक आदर्श मॉडेल तयार करण्याची सिडकोची योजना आहे. ​​​​​​​

नवी मुंबई : शहर निर्मितीचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सिडको महामंडळावर राज्य शासनाने आता पालघर नवीन शहर उभारण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार ३७७ हेक्टर जागेवर हे नवीन शहर उभारण्याची कार्यवाही सिडकोने सुरू केली आहे. प्रस्तावित नव्या शहरातील विकासाच्या संधी, बाजाराची स्थिती आदींचा आढावा घेण्याच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचारविनिमय करून विकासाचे एक आदर्श मॉडेल तयार करण्याची सिडकोची योजना आहे.शहर निर्मितीत सिडकोचा हातखंडा आहे. नवी मुंबई हे याचे उत्तम उदाहरण आहे. सिडकोचा हा अनुभव लक्षात घेऊन राज्य सरकारने अलीकडेच स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यात नवीन शहर उभारण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविली आहे. पालघर आणि बोईसर शहराच्या मधोमध ३७७ हेक्टर क्षेत्रफळाच्या जागेवर हे अद्यावत नवीन शहर साकारले जाणार आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षकांचे कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत, नवीन प्रशासकीय इमारत, प्रेक्षागृह, शासकीय विश्रामगृह तसेच जिल्हा मुख्यालयातील किमान दहा टक्के कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान आदींच्या उभारणीची जबाबदारीही सिडकोवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालयाच्या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पालघर नवीन शहर प्रकल्प उभारणीच्या दिशेनेसुद्धा सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे.प्रस्तावित नवीन शहराचा विकास नियोजनबद्ध व सर्वसमावेशक रितीने व्हावा यादृष्टीने आदर्श मॉडेल तयार करण्याचे काम सिडकोने हाती घेतले आहे. याअंतर्गत बाजाराचा कल, गुंतवणूकदारांची मानसिकता, खरेदीदारांच्या आपेक्षा आदींची चाचपणी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रस्तावित प्रकल्पाअंतर्गत जमिनीचा वापर, आवश्यक क्षेत्राची निवड, भाडेपट्ट्याच्या अटी, विकासाचे धोरण आदींबाबत औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचारविनिमय करण्याचा सिडकोचा इरादा आहे. त्याअनुषंगाने स्वारस्य अभिव्यक्ती अर्थात एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टचा मसुदाही प्रसिद्ध करण्यात आल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, पालघर नवीन शहर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर पालघर ते नवी मुंबई दरम्यान, दळवळण यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीनेसुद्धा सिडकोने चाचपणी सुरू केली आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबईpalgharपालघर