शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

महापौर निवडणुकीसाठी चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:14 IST

पनवेलमध्ये ७ जानेवारीला अर्ज दाखल होणार

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर डॉ. कविता चौतमोल यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने लवकरच पनवेलला नवीन महापौर मिळणार आहे. महापौर निवडीचा कार्यक्र म जाहीर झाला असून, १० जानेवारी रोजी पनवेल महानगरपालिकेचा नवीन महापौर व उपमहापौर निवडला जाणार आहे. विशेष सभेमध्ये महापौर, उपमहापौर निवडीचा कार्यक्र म पार पडणार आहे.पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम महापौरपदी विराजमान होण्याचा मान पहिल्यांदाच निवडून आलेल्या डॉ. कविता चौतमोल यांना मिळाला. पेशाने डॉक्टर, उच्चशिक्षित असलेल्या डॉ. चौतमोल यांच्या निवडीचे पनवेलकरांनी स्वागत केले. खुल्या महिला प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेविकांना महापौरपदी विराजमान होण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये मोजकीच नावे आहेत. खारघरमधील भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा व माजी महिला महिला बाळ कल्याण सभापती लीना अर्जुन गरड, संजना समीर कदम व नेत्रा किरण पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. महापौरपदाचा मान पनवेलला मिळाल्याने दुसरी संधी खारघरला मिळावी, अशी खारघरवासीयांची अपेक्षा आहे. मीडियावर त्याचे पडसाद पाहावयास मिळत आहेत. ७ जानेवारी महापौरपदाकरिता नामनिर्देशित अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. उपमहापौर विक्रांत पाटील यांचा कार्यकाळही संपुष्टात आल्याने उपमहापौरपदी नवीन वर्षात नवीन चेहरा पाहावयास मिळणार आहे.७ जानेवारी रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत महापौरपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आहे. १० रोजी दुपारी ३ वाजता याकरिता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महापौरपद कोणाला मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.