शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यावेतनापासून प्रकल्पग्रस्तांची मुले वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 00:10 IST

संतापाची लाट; सिडकोकडून बेलापूर ते ऐरोलीपर्यंतची २९ गावे दुर्लक्षित

नवी मुंबई : सिडको क्षेत्रातील पनवेल व उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना चालू शैक्षणिक वर्षाचे विद्यावेतन देण्याचा निर्णय सिडको व्यवस्थापनाने घेतला असला, तरी योजनेतून नवी मुंबई महापालिका हद्दीतील प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना विद्यावेतनापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे ठाणे तालुक्यातील सिडको प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.सिडकोकडून प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यावेतन दिले जात होते. मात्र, सिडकोने हे विद्यावेतन पनवेल व उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना देण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यात नवी मुंबई महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांचा उल्लेखही नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे. नवी मुंबई शहराच्या निर्मितीसाठी बेलापूरपासून ऐरोलीपर्यंतच्या २९ गावांच्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम सिडकोला जमिनी कवडीमोल भावाने दिल्या आहेत. त्या मोबदल्यात सिडकोने प्रकल्पग्रस्त आणि त्यांच्या पाल्यांसाठी काही कल्याणकारी योजना सुरू केल्या. त्यामध्ये विद्यावेतन योजनेचाही समावेश आहे.शासनाने सिडकोच्या नवी मुंबई प्रकल्पासाठी ठाणे, उरण, पनवेल या तिन्ही तालुक्यांच्या जमिनी संपादित करून शहर वसवले आहे आणि बक्कळ नफा ही कमावला आहे. मात्र, विद्यावेतन देताना मात्र ठाणे तालुक्याला वंचित ठेवले जात आहे. महाविकास आघाडी सरकारने न्याय द्यावा ही अपेक्षा आहे.- नीलेश पाटील, अध्यक्ष,आगरी कोळी युथ फाउंडेशनसिडकोची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात असताना तुटपुंज्या रकमेसाठी ही योजनाच बंद करण्याचा निर्णय हा प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांवर अन्याय आहे. याचा नवी मुंबईतील नेत्यांना विसर पडल्यामुळे त्यांनीच आता हे प्रलंबित प्रश्न सोडवावेत.- विजय पाटील, सचिव,आगरी कोळी समाजचॅरिटेबल ट्रस्टविद्यावेतन बंद करून या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचाच हा प्रकार आहे, त्यामुळे कोणताही दुजाभाव न करता, प्रकल्पग्रस्तांच्या वारस विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन सुरू करावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.- दीपक ह. पाटील, कार्याध्यक्ष,९५ गाव संघर्ष समिती,ठाणे तालुका