शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शॉक लागून बालकामगाराचा मृत्यू, रबाळे एमआयडीसी मधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 21:54 IST

आई व मोठ्या बहिणीला आधार देण्यासाठी तो कामाला जात होता. त्याच्या अपघाती निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई - विजेचा शॉक लागून बालकामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रबाळे एमआयडीसी मधील मॅचव्हील सिंडिकेट कंपनीत हा प्रकार घडला आहे. आई व मोठ्या बहिणीला आधार देण्यासाठी तो कामाला जात होता. त्याच्या अपघाती निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच, प्रकरण दडपण्यासाठी कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला.

अंश राजभर (१३) असे दुर्घटनेत मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. तो कोपर खैरणे सेक्टर १ येथे आई व मोठ्या बहिणीसोबत भाड्याच्या घरात राहायला होता. महापालिकेत सातवी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो मागील दोन वर्षांपासून मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. वडील कुटुंबापासून वेगळे झाल्यानंतर आई व मोठ्या बहिणीच्या सुखासाठी तो झटत होता. अशात नुकतेच तो रबाळे एमआयडीसी मधील मॅचव्हील सिंडिकेट या कंपनीत ठेकेदारामार्फत कामाला लागला होता. शुक्रवारी सकाळी तो नेहमी प्रमाणे रात्रपाळी संपवून घरी जायची तयारी करत असतानाच विजेचा शॉक लागला. यावेळी त्याला वाशीतील पालिका रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे त्याच्या आई व बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कंपनीच्या निष्काळजी मुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र तो बालकामगार असतानाही कागदोपत्री वय वाढवून त्याला नोकरीला ठेवण्यात आले होते. त्यामुळे ठेकेदारासह कंपनी पुढे कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी हे प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात राजभर कुटुंबाची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर कुटुंब ठाम राहिल्याने त्यांचा प्रयत्न फसला. 

अर्थकारणासाठी परिवाराची दिशाभूल अंशच्या अपघाती मृत्यूला संधी समजून एका राजकीय व्यक्तीने अर्थकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. कंपनी विरोधातली तक्रार टाळण्यासाठी कुटुंबाला चार लाखाचे आमिष दाखवण्याचा प्रयत्न झाला. शिवाय रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतली घटना असतानाही, कोपर खैरणेत पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयावर कुटुंब ठाम राहिल्याने त्याचा प्रयत्न फसला.राजभर कुटुंबाने रबाळे एमआयडीसी पोलीसांकडे तक्रार करून देखील एका अधिकाऱ्याकडून चालढकल सुरु होती. या अधिकाऱ्याने मृतदेहाच्या शवविच्छेदन दरम्यान शनिवारी वाशीतील रुग्णालयात देखील जाऊन प्रत्यक्षदर्शी सोबत अरेरावीची भाषा वापरत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. अखेर संबंधितांनी वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते यांना संपूर्ण घटनेबाबत कळवले. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी गीते यांनी परिवाराची भेट घेऊन त्यांना कारवाईचे आश्वासन दिले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई