शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

पनवेलमधील रुग्णालयाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 00:01 IST

रायगड जिल्ह्यातील सामान्य जनतेसाठी, तसेच वाढत्या रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार पनवेल येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय व २० खाटांचे ट्रॉमा केअर युनिट पूर्णत्वास आले

पनवेल : पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयाचे बुधवारी, ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच ते नागरिकांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील सामान्य जनतेसाठी, तसेच वाढत्या रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार पनवेल येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय व २० खाटांचे ट्रॉमा केअर युनिट पूर्णत्वास आले. रुग्णालयाच्या उभारणीपासून ते पूर्ण होईपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. लोकार्पण सोहळ्यास राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, रायगड पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, निरंजन डावखरे, मनोहर भोईर, सुरेश लाड, बाळाराम पाटील, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख उपस्थित राहणार आहेत.मेट्रोची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चाचणीसिडकोच्या नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. जवळपास ९0 टक्के कामे पूर्ण झाली असून पुढील काही महिन्यात प्रत्यक्ष मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तळोजा येथील मेट्रो शेडमध्ये मेट्रोची चाचणी घेतली जाणार आहे.खारघरमध्ये मेट्रोखालील २४५ बॅनर्स हटवलेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची चाचणी पार पडणार आहे. बेलापूर ते पेंधर दरम्यान खारघरमधील मेट्रो पिलरला लावलेले २४५ बॅनर पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवले. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे अनधिकृत बॅनर लावण्यात आले होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस