शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल न देता केली फसवणूक, Olx चा खरेदी-विक्री व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 02:12 IST

कळंबोली पोलिसांत गुन्हा दाखल

पनवेल : ओएलएक्स या अ‍ॅपवरती मोटारसायकलचे एक लाख २० हजार रुपये भरूनही मोटारसायकल न देता ३२ वर्षीय व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे. कळंबोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेक्टर २० रोडपाली, कळंबोली येथील सुशांत संभाजी रसाळ यांना दुचाकी घ्यायची होती. ते ओएलएक्स अ‍ॅप पाहत असताना बिमल सरकार (रा. धरणपूर, बकाली जलपानगुरी, पश्चिम बंगाल) या व्यक्तीने यामा मोटार सायकल विकण्यासाठीची जाहिरात टाकली होती. ही मोटारसायकल रसाळ यांना आवडली असल्याने त्याने बिमल यांच्याशी संपर्क केला. या वेळी त्याने मोटारसायकलचे फोटो पाठविले. तसेच बिमल हा दुचाकीचा डिलर असल्याचे रसाळ याला सांगितले. या वेळी ही मोटारसायकल लोकेश विजय शंकर (ता. टिप्पतूर, जि. तुमपूर) यांच्या नावे असल्याचे सांगून त्याने या मोटारसायकलचे आरसी बुकचा फोटो रसाळ याच्या व्हॉट्सअ‍ॅपवरती पाठविला. तसेच बिमल सरकारने त्याचा आधार कार्ड, व्हिजिटिंग कार्ड आणि त्याचा बँकेचा खाते क्रमांक पाठविला. त्यानंतर रसाळ याने मोटारसायकल ही एक लाख २० हजारला विकत घेतली व ते पैसे आॅनलाइन ट्रॅन्झाक्शनने बिमल सरकार यांच्या अकाउंटवर जमा केले.पैसे जमा केल्यानंतर रसाळ याने बिमल सरकार याला वारंवार फोन केला असता त्याने फोन उचलणे बंद केले आहे. त्या वेळी विमल सरकार याने आपली फसवणूक केली असल्याचे रसाळ यांच्या लक्षात आले. एक लाख २० हजार रुपये भरून देखील मोटरसायकल न दिल्यामुळे कळंबोली पोलीस ठाण्यात विमल सरकार याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :panvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबई