शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जादा नफ्याच्या आमिषाने फसवणूक

By admin | Updated: April 28, 2017 00:21 IST

नागरिकांना झटपट श्रीमंतीचे आमिष दाखवणाऱ्या एमएलएम कंपन्यांचे देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर जाळे पसरत चालले आहे.

सूर्यकांत वाघमारे / नवी मुंबई नागरिकांना झटपट श्रीमंतीचे आमिष दाखवणाऱ्या एमएलएम कंपन्यांचे देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर जाळे पसरत चालले आहे. अशा कंपन्यांकडून नागरिकांच्या फायद्याऐवजी फसवणुकीची अधिक शक्यता असून, तसे प्रकार देखील यापूर्वी घडलेले आहेत. त्यामुळे आजवर दुर्लक्षित ठरलेल्या या कंपन्यांच्या हालचालीवर पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.सद्यस्थितीला प्रत्येकाची आपली आर्थिक कुवत उंचावण्याचे प्रयत्न सुरूअसल्याचे पहायला मिळते. त्यामुळे समाजात वेगळी प्रतिमा तयार करण्याच्या प्रयत्नात अनेक जण झटपट श्रीमंत होण्याचे नवनवीन मार्ग आजमावत असतो. अशांचे समूह अनेक देशांमध्ये सक्रिय झाले आहेत. त्याकरिता गुंतवणूकदारांना जादा नफ्याचे आमिष दाखवणाऱ्या कंपन्या चालवल्या जात आहेत. सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी प्रत्यक्षात आलेल्या मल्टी लेवल मार्केटिंग (एमएलएम) कंपन्यांची संख्या शेकडोंच्या घरात गेली आहे. त्यापैकी काही कंपन्या अवघ्या काही वर्षांतच बंद पडल्याने, फसवणूक झालेल्यांची संख्या लाखोच्या घरात आहे. त्यामुळे अशा कंपन्यांच्या आमिषाला नागरिक बळी पडू नयेत याची खबरदारी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.साखळी पध्दतीने चालणाऱ्या या एमएलएम कंपन्यांकडून सुरवातीच्या काही गुंतवणूकदारांना नफा दिला जातो. परंतु त्यानंतर जोडल्या जाणाऱ्या सदस्यांना गुंतवणुकीचा मोबदला मिळेलच असे नाही. शिवाय ठरावीक वर्षांनंतर गुंतवणूकदारांची संख्या वाढलेली असते. त्यामुळे कोट्यवधीची रक्कम जमा झाल्यानंतर संबंधितांकडून कार्यालयाला टाळा ठोकून पळ काढला जातो. अनेकदा गुंतवणूकदारांना मोबदला म्हणून दिले जाणारे चेक देखील वटत नाहीत. परंतु पोलिसांकडे तक्रार करेपर्यंत संबंधितांनी धूम ठोकलेली असते. असे प्रकार टाळण्यासाठी जादा नफ्याचे अथवा व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणुकीला प्रवृत्त करणाऱ्या कंपन्यांपासून लांब राहणेच नागरिकांच्या हिताचे ठरू शकते.असाच फसवणुकीचा प्रकार टाळण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पोलिसांनी रविवारी आंतरराष्ट्रीय वन कॉइन या मार्केटिंग कंपनीच्या सेमिनारवर छापा टाकून त्यांचा कट उधळून लावला. याप्रकरणी अठरा जणांना अटक देखील करण्यात आली आहे. देशात आर्थिक व्यवहार करण्यासाठी आरबीआयची परवानगी आवश्यक असून नियमावली देखील ठरवून देण्यात आलेली आहे. मात्र आरबीआयचे सर्व नियम धाब्यावर बसवून एमएलएम कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना झटपट श्रीमंतीचे दिवास्वप्न दाखवत जादा नफ्याचे आमिष दिले जात आहे. त्यात फसला जाणारा सर्वाधिक घटक हा मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. स्वत:कडील जमा रकमेची गुंतवणूक करून मिळणाऱ्या नफ्यातून स्वत:ची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांचा उद्देश असतो. झालेली ही फसवणूक अनेकांच्या जिवावर देखील बेतू शकते. त्यामुळे एमएलएम कंपन्यांच्या होणाऱ्या सेमिनारवर पोलिसांनी पाळत ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.