शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

महाड तालुक्यात निवडणुकीसाठी चौरंगी लढती अटळ

By admin | Updated: February 9, 2017 04:45 IST

महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने निर्विवाद यश संपादन केल्याने माजी आ. माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे

महाड : महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने निर्विवाद यश संपादन केल्याने माजी आ. माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे शहरात वर्चस्व असल्याचे स्पष्ट केले. मात्र, महाड तालुक्याच्या ग्रामीण भागात मतदार कुठल्या पक्षाला कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे पाहिले जात आहे.महाड तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी ३० तर पंचायत समितीच्या दहा जागांसाठी ४८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून शिवसेना, काँग्रेस, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे चारही पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यामुळे येथे चौरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादीने काँगे्रससोबत आघाडी न केल्याने त्या पक्षातील जिल्हा सरचिटणीस धनंजय देशमुख यांच्या पत्नी पल्लवी बागडे देशमुख यांना काँग्रेसकडून नाते जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीच्या अनिल येरुणकर यांच्या पत्नी अपर्णा येरुणकर यांनाही काँग्रेसने खरवली पं. स. गणातून उमेदवारी दिली आहे. बिरवाडी गटातून शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच माधव बागडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर विन्हेरे जि .प गटातून जिल्हा परिषद सदस्य नीलेश ताठरे यांच्या पत्नी निकिता ताठरे यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेचे माजी मंत्री प्रभाकर मोरे यांच्या स्नुषा वृषाली मोरे यांनीही अर्ज दाखल केल्याने या विन्हेरे भागातील शिवसेनेत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र १३ फेब्रुवारीला याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्वभूमिवर शिवसेनेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात भाजपाला बळ मिळाले आहे. तर पंचायत समितीच्या सात ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत. भाजपाकडून मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर व भाजपा जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावली असून शिवसेनेकडून आ. भरत गोगावले, काँग्रेसकडून माजी आ. माणिक जगताप यांच्या नेतृत्वखाली विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. (वार्ताहर)1 उरण : रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उरण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ जागा जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी चालविली आहे. मागील पाच वर्षांपासून उरण पंचायत समितीवर सत्ता असलेल्या सेनेला या निवडणुकीत वर्चस्व राखणे अवघड जागेचे दुखणं होऊन बसले आहे. उनपच्या निवडणुकीत अंतर्गत गटबाजी आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमधील नाराजीचा फटका बसल्याने स्वबळावर लढणाऱ्या सेनेला दारुण पराभवाला सामोरे जाण्याची पाळी आली होती. उनपच्या निवडणुकीच्या स्थितीप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही परिस्थिती कायम असल्याने सत्ता टिकविणे सेनेला सोपे नाही. 2 भाजपानेही स्वबळावर तर शेकाप-काँग्रेस आघाडीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादी आणि मनसेला आघाडीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे मनसेने तरी पं. स. च्या दोन जागांवर उमेदवारी अर्जदाखल केले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांबरोबर तालुक्यातील नागरिकांच्या नजरा या निवडणुकीकडे लागल्या आहेत. रायगड जि. प. च्या उरण गण आणि गटाच्या एकूण १२ जागांसाठी सोमवारी काँग्रेस-शेकाप आघाडी, शिवसेना, मनसे आणि अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.3 यामध्ये जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी २६ तर पंचायत समितीच्या ८ जागांसाठी ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १३ आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच उरणमध्ये तिरंगी की बहुरंगी लढती होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. चाणजे, चिरनेर, नवघर, जासई या चार जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या केगाव, चाणजे, नवघर, भेंडखळ, चिरनेर, आवरे, जासई, विंधणे या आठ अशा एकूण १२ जागांसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. उरणमधील मतदार : जासई गटात एकूण २०,००५ मतदार आहे. जासई पं. स. गणात ४०७५ पुरुष व स्त्री मतदार ४१४१ असे एकूण ८२१६ मतदार आहेत. विंधणे गणात ५७९३ पुरुष तर स्त्री मतदार ५९९६ असे ११,७८९ मतदार आहेत. चाणजे गटात २३,९४० मतदार आहेत. चाणजे पं. स. गणात ७२९९ पुरुष तर स्त्री मतदार ७१७१ असे एकूण १४,४७० मतदार आहेत. केगाव पं. स. गणात ४८०८ पुरुष तर स्त्री मतदार ७७४१ असे एकूण १४,९९५ मतदार आहेत. आवरे पं. स. गणात ७२५१ पुरुष तर स्त्री मतदार ७६९१ असे एकूण १४,९४२ मतदार आहेत. नवघर जि. प. गटात एकूण २३,०४५ मतदार आहेत. तर नवघर पं. स. गणात ५३१९ पुरुष तर स्त्री मतदार ५५६८ असे एकूाण १०,८८७ मतदार आहेत. भेंडखळ पं. स. गणात ६३७६ पुरुष तर स्त्री मतदार ५७८२ असे एकूण १२,१५८ मतदार आहेत.दादर गणाला महत्त्वपेण : काँगे्रसच्या होमपीचवरील रावे जिल्हा परिषद गटातील दादर पंचायत समिती गण अनुसूचित जमाती महिला आरक्षण आहे. पेण पंचायत समिती सभापतीपद हे याच आरक्षणाची लॉटरी लागल्याने दादर गणातील लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणूक लढतीत रावे जिल्हा परिषद गट व दादर, रावे पंचायत समिती गणावर आतापर्यंत काँग्रेस पक्षचे वर्चस्व राहिले आहे. मात्र प्रभाग रचनेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या, अंतोरे, पाटणोली, वरेडी, काळेश्री या ग्रामपंचायत रावे, जिल्हा परिषद गटात व दादर पंचायत समिती गणात समाविष्ट करण्यात आल्यात. दादर पंचायत समिती गणात आता दादर, सोनरवार, काळेश्री, कणे, पाटणोली, अंतोरे, वरेडी या ग्रामपंचातींचा समावेश आहे. यामध्ये शेकाप व काँग्रेस या दोन्ही पक्षाची ताकद तोडीस तोड आहे. त्यामुळे शेकापच्या स्मिता पेणकर विरुद्ध काँग्रेसच्या संगीता मोकल ही अनुसूचित जमाती महिला राखीव सीटवर दोन्ही पक्ष ताकद लावून पंचायत समितीवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे दादर गणाला या निवडणुकीत महत्त्व प्राप्त झाले आहे.