शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीतील गुटखा विक्री रॅकेट थांबविण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 23:51 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुटखा पुरवठा करणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे आव्हान पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुटखा पुरवठा करणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे आव्हान पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनासमोर उभे राहिले आहे. तक्रारी करूनही माफियांवर कडक कारवाई होत नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. अवैध व्यवसाय करणाऱ्यांना अभय मिळत असल्यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.एपीएमसीच्या भाजी मार्केटजवळील बंद इमारतीमध्ये ९ मे रोजी गुटख्याचा अवैध साठा पोलिसांना आढळून आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास केला असता संशयित आरोपीचा रिक्षा व घरामध्येही मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला होता. जप्त केलेला माल कारवाई न करता सोडण्यासाठी पोलिसांनी संबंधिताकडे ६० हजार रुपये लाच मागितली होती. या घटनेविषयी संबंधिताने ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी २७ मार्चला सापळा रचून एपीएमसी पोलीस ठाण्यातीलकर्मचारी रामेश्वर खताळ व साईछत्र टी अँड पान शॉपमधील कर्मचारी भुरा गमीरा पाटीदार याला ३० हजार रुपये लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या घटनेमुळे एपीएमसी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. अवैध गुटखा विक्रीच्या व्यवसायाला पोलिसांकडूनच अप्रत्यक्षपणे अभय मिळत असल्याची चर्चा केली जात आहे. शासनाने गुटखा बंदी केल्यानंतरही बाजार समितीच्या पाचही मार्केटमधील पानटपºयांमध्ये उघडपणे गुटखा विक्री केली जाते. याविषयी कामगारांसह अनेकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यानंतर सुरक्षारक्षकांनीही कारवाई करून गुटखा जप्त केला आहे. सुरक्षा विभागाने याविषयीचा अहवाल पोलिसांनाही दिला आहे. पण संंबंधितांवर कडक कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.एपीएमसी परिसरामध्ये तक्रारी वाढल्या की गुटखा विक्री करणाºयांविरोधात किरकोळ कारवाई केली जाते. पण पूर्णपणे गुटखा विक्री थांबविली जात नाही. सरसकट सर्वांवर कारवाईही केली जात नाही. या परिसरामध्ये एकाच कुटुंबातील चार ते पाच व्यक्ती पानटपºयांना गुटखा पुरविण्याचे काम करत आहेत. त्यांनी अनेक पानटपºया विकत व भाडेकरारावर चालविण्यासाठी घेतल्या आहेत.२० पेक्षा जास्त टपºया संबंधितांकडे असल्याची चर्चा आहे. गुटखा पुरविण्याचे काम कोण करतो याची बाजार समितीमधील सर्वांनाच माहिती असतानाही संबंधितांवर पोलीस, अन्न व औषध प्रशासनासह बाजार समितीने कधीच कडक कारवाई केलेली नाही. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी या परिसराकडे फारसे लक्ष देत नाहीत.पोलीस त्यांची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर झटकत असून एपीएमसी प्रशासनानेही गांभीर्याने या समस्येकडे लक्ष दिले नाही. यामुळे ठरावीक व्यक्तींनी गुटखा विक्रीचे साम्राज्य निर्माण केले असून लाचलुचपत विभागाच्या कारवाईनंतर तरी पोलीस कडक भूमिका घेऊन सर्व अवैध व्यवसाय थांबविणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.>मोकळ्या इमारतीमध्ये गोदामभाजी मार्केट व विस्तारित भाजी मार्केटच्या मध्ये सिडकोने बालवाडीसाठी इमारत बांधली होती. मोडकळीस आलेली ही वास्तू बाजार समितीकडे हस्तांतर करण्यात आली आहे. पण त्याचा वापर धर्मशाळेप्रमाणे होऊ लागला आहे. गुटखा विक्री करणाºयांसह पानटपरीमधील इतर साहित्य ठेवण्यासाठी गोदामाप्रमाणे त्या इमारतीचा वापर केला जात आहे.याच इमारतीमध्ये गुटख्याचा साठाही सापडला होता. सद्यस्थितीमध्ये याठिकाणी अनधिकृतपणे खानावळ सुरू करण्यात आली आहे.>‘लोकमत’ने उठविला होता आवाजबाजार समितीमध्ये गुटखा विक्रीचे रॅकेट सक्रिय असल्याचे ‘लोकमत’च्या टीमने स्टिंग आॅपरेशन करून निदर्शनास आणून दिले होते. भाजी, फळ व इतर मार्केटमधील पानटपºयांमध्ये सुरू असलेल्या गुटखा विक्रीची छायाचित्रेही प्रसिद्ध केली होती. याची दखल घेऊन सुरक्षारक्षकांनी कारवाई करून गुटखा जप्तही केला होता. पोलिसांनाही याचा अहवाल दिला होता, परंतु पोलिसांकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. अवैध व्यवसाय करणाºयांना अभय मिळू लागले होते.>मार्चपासून तीनवेळा कारवाईएपीएमसी परिसरामध्ये मार्चपासून तीन वेळा गुटखा विक्रेत्यांवर कारवाई झाली आहे. १३ मार्चला भाजी मार्केटमधील पानटपरीवर धाड टाकून २३ हजार ७७५ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला होता. सुधीरकुमार पाठक, राहुल चौहान, जितू दास व कालू उर्फ प्रमोद दासविरोधात गुन्हा दाखल केला होता. २३ एप्रिलला भाजी मार्केटमध्येच कारवाई करून सुभाष श्रीवास्तव या टपरी चालकावर कारवाई केली होती. ९ मे रोजी भाजी मार्केटच्या बाहेरील मोकळ्या इमारतीमध्ये धाड टाकून गुटख्याचा साठा जप्त केला होता. येथीलच एका कारवाईमधील जप्त केलेला माल सोडून देण्यासाठी लाच घेताना पोलीस कर्मचाºयाला अटक केली आहे.