शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

आव्हान बदलत्या गुन्हेगारी स्वरूपाचे, हॅकर्सची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 07:27 IST

बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत चालल्याने स्मार्ट गुन्हेगारी ही जागतिक समस्या बनली आहे. वेबसाइट हॅक करून, लॉटरी लागल्याच्या इमेलद्वारे, अथवा बनावट एटीएम तयार करून आर्थिक फसवणुका होत आहेत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत चालल्याने स्मार्ट गुन्हेगारी ही जागतिक समस्या बनली आहे. वेबसाइट हॅक करून, लॉटरी लागल्याच्या इमेलद्वारे, अथवा बनावट एटीएम तयार करून आर्थिक फसवणुका होत आहेत. अशा गुन्ह्यांमागे देश-विदेशातील आयटी क्षेत्रातील सराईत गुन्हेगारांचा समावेश असल्याने त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान येत्या काळात पोलिसांपुढे राहणार आहे.स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत, मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीची पद्धतही स्मार्ट बनली आहे. काही वर्षांपूर्वी ठरावीक उद्देशाने मारामारी, हत्या, जबरी चोरी असे गुन्हे घडायचे. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांत इंटरनेटद्वारे घडणाºया गुन्हेगारी पद्धतीने शहरात डोके वर काढले आहे; परंतु अशा गुन्ह्यांचा सूत्रधार देश-विदेशातील कोणत्या कोपºयात लपला आहे, हे इंटरनेटच्या जाळ्यातून शोधून काढणे सहज शक्य नसल्याने भविष्यात पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण होणार आहे. त्याकरिता पोलिसांचा सायबर सेलही तितकाच सक्षम करणे, ही काळाची गरज बनली आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणारा सायबर हल्ला जून महिन्यात जेएनपीटीच्या सर्व्हरवर झाला होता. त्या ठिकाणी देश-विदेशातील सुमारे ३ ते ४ हजार कंटेनरची प्रतिदिन आवक-जावक सुरू असते. ही यंत्रणा पूर्णपणे संगणकाद्वारे हाताळली जात असून, नेमका त्याच सर्व्हरवर हा सायबर हल्ला झाला होता. अज्ञात हॅकर्सने तिथले अडीचशेहून अधिक संगणक ठप्प करून, ते व्हायरसमुक्त करण्यासाठी ३०० डॉलर्स बिटकॉइन खंडणी मागितली होती. आयटी क्षेत्राने भरलेल्या नवी मुंबई सारख्या स्मार्ट सिटीला येत्या काळातील गुन्हेगारी पद्धतीपासून सतर्क करणारा हा सायबर गुन्हा होता; परंतु यानंतरही बदलत्या गुन्हेगारीच्या स्वरूपाचे पोलीस व नागरिकांकडून फारसे गांभीर्य घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे नायझेरियन स्कॅम, आॅनलाइन फसवणूक अशा घटना सुरूच आहेत. त्यापैकी काही गुन्ह्यांची उकल पोलिसांच्या सायबर सेलने करून गुन्हेगारांना अटकही केलेली आहे. मात्र, सायबर गुन्ह्यांत माहीर असलेल्यांपर्यंत पोलिसांचे हात अद्याप पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांसाठी पुढील काही वर्षे तरी सतर्कता हाच सायबर गुन्ह्यांपासून वाचण्याचा उत्तम पर्याय ठरू शकतो.व्यापार क्षेत्रातली व्याप्ती विदेशापर्यंत पोहोचल्याने त्यांच्यातील व्यवहार इमेलद्वारे होतात. अशा व्यवहारांवर लक्ष ठेवून संबंधित कंपनीचा बनावट इमेल तयार करून व्यवहाराची रक्कम वेगळ्याच खात्यात जमा करून घेतली जात आहे. तर फेसबुक, मॅट्रिमोनीअल वेबसाइटवरील बनावट खात्याद्वारे तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, बलात्कारासारख्या गंभीर घटना घडत आहेत. तर तरुणींचे खासगी फोटो व्हायरल करून त्यांना ब्लॅकमेल केले जाते.सायबर गुन्ह्यांचा बळी पडण्यापासून वाचण्यासाठी मोबाइलवर इंटरनेट व संगणकाच्या वापरकर्त्यांनी पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे. अनावश्यक इमेलद्वारे दाखवलेल्या प्रलोभनापासून दूर राहणे गरजेचे आहे. तसेच बँक खात्याशी संबंधित माहिती अनोळख्या व्यक्तीला देण्याचे टाळले पाहिजे, तरच अशा गुन्हेगारी घटनांना आळा बसणे शक्य आहे.जेएनपीटीवरील सायबर हल्ल्यानंतर भविष्यातली गुन्हेगारीची स्मार्ट पद्धत समोर आली आहे. जुलै महिन्यात रिलायन्स जिओच्या ग्राहकांची माहिती चोरून स्वत:च्या फायद्यासाठी ती संकेतस्थळावर टाकल्याचा प्रकार घडला होता.हॅकर्सकडून गोपनीय माहिती चोरून संबंधिताला खंडणीसाठी धमकावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर ब्लू व्हेल गेमच्या माध्यमातून तरुणांना आत्महत्येला भाग पाडणे, हासुद्धा सायबर गुन्ह्याचाच प्रकार आहे. यासंदर्भात सर्वसामान्यांना जागरुक करण्याची गरज निर्माण झाली आहे.नायजेरीयन स्कॅमचा धोकासायबर गुन्हे करणाºयांकडून गुन्हा करण्यासाठी बनावट इंटरनेट आयपीचा वापर केला जातो, असे आयपी बदलणारे सॉफ्टवेअरही उपलब्ध आहेत. यामुळे इंटरनेच्या जगभर पसरलेल्या जाळ्यामधून त्या आयपीचा नेमका वापर कुठून झाला, हे शोधणे तितके सहज शक्य नाही. याकरिता पोलिसांकडेही आयटी तज्ज्ञांची आवश्यकता आहे; परंतु याबाबत शासनाने अद्याप फारसे गांभीर्य घेतलेले नसल्याने नवी मुंबई पोलिसांचेच संकेतस्थळ दोनदा हॅक झाले होते.लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाºया नायजेरीयन टोळ्यांनी आंतरराष्टÑीय स्तरावर जाळे पसरवले आहे. त्यामुळे अशा गुन्ह्याला नायजेरीयन स्कॅम अशी ओळख मिळाली आहे. एखाद्या व्यक्तीला लॉटरी लागल्याचा इमेल पाठवून प्राथमिक स्वरूपात त्याच्याकडून बँकेची माहिती मिळवली जाते.लॉटरी लागलेली रक्कम मिळवण्यासाठी ठरावीक रकमेची मागणी करून ती दिल्यास संपर्क तोडला जातो. अथवा ग्राहकाने दिलेल्या बँकेच्या माहिती आधारे त्याच्या खात्यातून रक्कम लुटली जाते.

टॅग्स :Crimeगुन्हाNavi Mumbaiनवी मुंबई