शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज पुरवठ्यात विद्यार्थ्यांची साखळी, चौघांकडून २३ लाखांचा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 08:38 IST

Crime News: अमली पदार्थविरोधी पथकाने उलवे येथून २३ लाख रुपयांचे एलसीडी ड्रग्ज जप्त केले. या तस्करीत चार विद्यार्थी पोलिसांच्या हाती लागले. ही कारवाई शुक्रवारी रात्री अमली पदार्थविरोधी पथकाने केली. हिमांशू प्रजापती (१९), विजय शिर्के (२३), सिद्धेश चव्हाण (२५) व आदर्श सुब्रमण्यम (२२) अशी आरोपींची नावे आहेत.

नवी मुंबई - अमली पदार्थविरोधी पथकाने उलवे येथून २३ लाख रुपयांचे एलसीडी ड्रग्ज जप्त केले. या तस्करीत चार विद्यार्थी पोलिसांच्या हाती लागले. ही कारवाई शुक्रवारी रात्री अमली पदार्थविरोधी पथकाने केली. हिमांशू प्रजापती (१९), विजय शिर्के (२३), सिद्धेश चव्हाण (२५) व आदर्श सुब्रमण्यम (२२) अशी आरोपींची नावे आहेत.

उलवे परिसरात ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला. त्या ठिकाणी आलेल्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २२ लाख ८० हजार रुपयांचे ११४ एलसीडी पेपर मिळाले. या प्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमांशू उलवे येथील राहणारा असून, बाकीचे पनवेल येथे राहणारे आहेत. यापूर्वी देखील शहरातून एलसीडी पेपर जप्त केले आहेत. विद्यार्थी, तरुणांमध्ये ड्रग्ज सेवनाचे प्रमाण अधिक आहे. शहरातील काही क्लबमध्येदेखील त्याचा वापर होत असल्याची दाट शक्यता आहे.

रॅकेट उद्ध्वस्तअटक केलेले चौघेही विद्यार्थी असून, त्यांच्यामार्फत पनवेल परिसरातील नशेच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवले जात होते. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सापळा रचला. चौघांच्या अटकेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवठ्याचे रॅकेट उद्ध्वस्त झाले असून यात आणखी कोण सहभागी आहेत, ड्रग्ज कोठून आणले, याचा तपास पोलिस करत आहेत.

 

टॅग्स :ArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबईDrugsअमली पदार्थ