शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

प्रांतिक संघटनांसह सामाजिक संस्थांवर लक्ष केंद्रित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:20 IST

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नवी मुंबईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नवी मुंबईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शहरामधील आठ लाख २५ हजार मतांवर शिवसेनेसह राष्ट्रवादीने लक्ष केंद्रित केले आहे. जास्तीत जास्त मते पारड्यामध्ये पाडून घेण्यासाठी प्रांतनिहाय संघटना, सामाजिक संस्था यांच्याही बैठका घेतल्या जात आहेत.राज्यातील सर्वाधिक २३ लाखांपेक्षा जास्त मतदार ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. प्रमुख लढत शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये असून, दोन्ही उमेदवार ठाणे शहरामधील आहेत, यामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईमध्ये प्रचाराविषयी अनुत्साहाचे वातावरण होते. प्रचारामधील मरगळ झटकून टाकण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे व राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी शहरात रॅली काढून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघांमध्ये एकूण आठ लाख २५ हजार १६६ मतदार आहेत. नवी मुंबईमधून कोणाला मताधिक्य मिळणार यावर निकाल अवलंबून असणार आहे. यामुळे येथून जास्तीत जास्त मते मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून त्यासाठी सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग राबविला जात आहे. देशाच्या व राज्यातील कानाकोपऱ्यामधून नागरिक येथे राहण्यासाठी आले आहेत. केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व इतर राज्यांची भवन व सामाजिक संघटना शहरामध्ये कार्यरत असून, सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, कोकणामधील नागरिकांच्या संघटनाही अस्तित्वात आहेत. निवडणुकांमुळे सामाजिक संस्था व प्रांतनिहाय संघटनांनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.राष्ट्रवादी व काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी वाशीमध्ये केरळ समाजामधील काही नागरिकांची बैठक घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. शिवसेना पदाधिकाºयांनी माथाडी भवनमध्ये मुस्लीम समाजामधील नागरिकांशी संवाद साधला. प्रत्येक प्रांत व समाजाची एकगठ्ठा मते मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी विविध समाजाच्या पदाधिकाºयांच्या व नागरिकांच्या बैठका आयोजित केल्या जात आहेत. नवी मुंबईमध्ये वास्तव्यास आलेल्या विविध समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठीचे आश्वासन दिले जात आहे. समाजासाठी भवन उभारण्यापासून ते विविध प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी माथाडी कामगारांपासून विविध संघटनांच्या बैठकांचेही आयोजन करण्यात आले होते. संस्था व संघटनांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक संघटनांनी कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यापेक्षा सर्वांचे स्वागत करून सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही एका पक्षाचे समर्थन करत असल्याचा ठपका बसू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.>प्रत्येक पक्षाचे सेल सक्रियनवी मुंबईमध्ये या पूर्वीच्या निवडणुकांमध्येही प्रांतिक व सामाजिक संघटनांना महत्त्व देण्यात आले होते. सर्वच राजकीय पक्षांकडे कोणत्या राज्यातील किती नागरिक नवी मुंबईमध्ये वास्तव्यासाठी आहेत. मतदार यादीचाही अभ्यास करून त्याप्रमाणे वर्गीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक समाजाची एकगठ्ठा मतांसाठी शिवसेनेसह राष्ट्रवादीनेही सेल तयार केले आहेत. शिवसेनेने नुकतेच उत्तर भारतीय समाजातील पदाधिकाºयांसाठी प्रशिक्षण शिबिराचेही आयोजित केले होते.>मतदारांचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्ननवी मुंबईमध्ये राहणाºया अनेक नागरिकांची त्यांच्या गावाकडील मतदारसंघामध्येही मतदारयादीमध्ये नावे आहेत. विविध राज्यांमधील नागरिकांचेही त्यांच्या मूळगावाकडेही मतदारयादीमध्ये नाव आहे. ज्यांचे दोन ठिकाणी नाव नाही; परंतु गावाकडे राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे गावाकडील नेत्यांकडून प्रचारासाठी बोलावले जात आहे, यामुळे मतदारांचे व कार्यकर्त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.>मताधिक्यासाठी रस्सीखेचनवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ८ लाख २५ हजार मतदार आहेत. ऐरोली मतदारसंघात ४ लाख ४८ हजार ६८१ मतदार, बेलापूर मतदारसंघात ३ लाख ७६ हजार ४८५ मतदार आहेत. गत निवडणुकीमध्ये दोन्ही मतदारसंघांमधून शिवसेनेला मताधिक्य मिळाले होते. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये मिळालेले मताधिक्य टिकविण्याचे आव्हान या वेळी शिवसेनेसमोर असणार आहे. ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यावर राष्ट्रवादीच्या उमेदवाराची जबाबदारी आहे.