आविष्कार देसाई / लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : केलेल्या कामाचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले नाही तर अथक परिश्रम घेऊन सुध्दा केलेल्या कामाला काहीच किंमत राहत नाही. असाच काहीसा अनुभव रायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी विभागाला आला आहे. नियमानुसार केलेल्या कामाचे फोटो वेबसाईटवर टाकण्यास ते कमी पडले आहेत. आतापर्यंत जिल्ह्याचे फक्त २१ टक्केच काम पूर्ण झाल्याने केंद्र सरकारचे स्वच्छता मिशनचे आर्थिक सल्लागार समीर कुमार यांनी प्रशासनाला चांगलेच फटकारले आहे. प्रशासनाच्या या कासवछाप कामाला गती येणे गरजेचे झाले आहे.रायगड जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्याचे महत्त्वपूर्ण काम रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागावर सोपविण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानासाठीच या स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी त्यांना मनुष्यबळ आणि आवश्यकत्या तांत्रिक सुविधा सरकारने देऊ केल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या विभागाला कोट्यवधी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात येते. अभियान यशस्वी व्हावे यासाठी विविध कंपन्यांनी आपल्या सीएसआरमधून निधी दिला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जेएसडब्लू कंपनीचा फार मोठा वाटा आहे. जिल्ह्यात बांधण्यात आलेली शौचालये यांचा रेकॉर्ड ठेवण्याचे तसेच तो वेबसाईटवर टाकण्याचे काम स्वच्छता विभागालाच करावे लागते. ज्या ज्या ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे तेथील लाभार्थ्यांसह नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालयाचा फोटो वेबसाईटवर अपलोड करणे बंधनकारक आहे. यासाठी संबंधित ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्यासह पाणी व स्वच्छता मिशन विभागाची ही जबाबदारी आहे. २० आॅक्टोबर २०१४ ते २३ मे २०१७ या कालावधीत जिल्ह्यामध्ये तब्बल ८४ हजार ४९६ शौचालये बांधण्यात आली आहेत. पैकी १८ हजार ५०९ शौचालयांचे फोटो अपलोड करण्यात प्रशासनाला यश आले आहे. फक्त २१ टक्केच काम झाले आहे. अद्यापही ६५ हजार ९८७ शौचालयांचे फोटो अपलोड करण्याचे काम बाकी आहे. मोठ्या प्रमाणात काम होऊनही ते रेकॉर्डवर न आल्याने केंद्र सरकारचे स्वच्छता मिशनचे आर्थिक सल्लागार समीर कुमार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. समीर कुमार हे गेल्याच आठवड्यात रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कामांचा आढावा घेतला होता. कामात तातडीने सुधारणा करण्याचे निर्देशही त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांना दिले होते.मोठ्या प्रमाणात काम होऊनही ते रेकॉर्डवर न आल्याने केंद्र सरकारचे स्वच्छता मिशनचे आर्थिक सल्लागार समीर कुमार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. समीर कुमार हे गेल्याच आठवड्यात रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कामांचा आढावा घेतला होता. जिल्ह्यामध्ये तब्बल ८४ हजार ४९६ शौचालये बांधण्यात आली आहेत. पैकी १८ हजार ५०९ शौचालयांचे फोटो अपलोड करण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र अद्यापही ६५ हजार ९८७ शौचालयांचे फोटो अपलोड करण्याचे काम बाकी आहे. यामुळे समीर कु मार यांनी नाराजी व्यक्त करु न अधिकाऱ्यांना फटकारले होते.रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याने सर्वाधिक जास्त फोटो अपलोडचे काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत ५२.२७ टक्के काम केले आहे, तर कर्जत तालुक्याचे सर्वाधिक कमी म्हणजेच ३.७० टक्के काम झाले आहे.कामामध्ये तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना समीर कुमार यांनी केल्या आहेत. शौचालय बांधणीचे काम चांगल्या पध्दतीने झाले आहे. मात्र त्याचे फोटो अपलोड करण्यात मागे पडलो आहे. त्यामुळे आॅनलाइनला जिल्ह्याचे काम दिसून येत नाही. त्यामध्ये निश्चितच सुधारणा करण्यात येईल, असे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
रेकॉर्ड न ठेवल्याने केंद्राने फटकारले
By admin | Updated: May 30, 2017 06:20 IST