शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
4
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
5
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
6
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
7
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
9
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
10
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
11
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
12
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
13
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
14
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
15
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
16
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
17
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
18
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
19
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
20
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

दक्षिण नवी मुंबईवर सीसीटीव्ही वॉच

By admin | Updated: August 7, 2016 03:23 IST

सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच दक्षिण नवी मुंबईवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक सुरक्षेच्यादृष्टीने हे महत्वपूर्ण पाउल उचलण्यात

नवी मुंबई : सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच दक्षिण नवी मुंबईवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक सुरक्षेच्यादृष्टीने हे महत्वपूर्ण पाउल उचलण्यात आले आहे. एकूण ५७२ कॅमरे बसविण्याची सिडकोची योजना आहे. यापैकी प्राथमिक स्तरावर खारघर परिसरात १२४ सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत. त्याच्या नियंत्रण केंद्राचे सोमवारी उद्घाटन करण्यात येणार आहे. स्मार्ट दक्षिण नवी मुंबई प्रकल्पाअंतर्गत सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात मोडणाऱ्या खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल, नवीन पनवेल, उलवे, द्रोणागीरी, उरण व न्हावाशेवा या क्षेत्रात सार्वजनिक सुरक्षा व वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. १0८ कोटी ६५ लाख रूपये खर्च करून तब्बल ५७२ कॅमरे बसविण्याची योजना आहे. ५ आॅक्टोबर २0१५ रोजी या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली होती. २0१७ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट सिडकोने ठेवले आहे. त्यानुसार सध्या खारघर परिसरातील सार्वजनिक ठिकाणी १२४ कॅमरे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून या यंत्रणेवर देखरेख ठेवली जाणार आहे. सोमवार ८ आॅगस्ट रोजी या प्रकल्पाच्या नियंत्रण कक्षाचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. उद्दिष्ट व ध्येयसार्वजनिक सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने सिडकोने या उपाययोजना आखल्या आहेत. याअंतर्गत शहरातमध्ये प्रवेश करणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या ठिकाणे, महत्वाची चौक, टोल नाके, ट्राफिक जंक्शन, रस्ते, उद्याने, रेल्वे स्थानके, शाळा व महाविद्यालये आदी ठिकाणी ही सीसीटीव्हीची यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात पोलिसांना मदत होणार आहे. गुन्ह्यांचा तपास लावणे, शोधकार्यात सहकार्य आदींसाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल, असा सिडकोचा दावा आहे.