शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

पालिका क्षेत्रातील पक्षी-प्राण्यांसह दुर्मीळ वनस्पतींचे होणार संगोपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 23:59 IST

जैवविविधता नियंत्रण समितीची स्थापना; ठाण्याच्या धर्तीवर बायोडायव्हर्सिटी गार्डन तयार करण्याचे उद्देश

- वैभव गायकरपनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रजातीच्या वनस्पती, भातपीक, प्राणी, कीटक, मॅन्ग्रोस आदीचे पालिकेच्या मार्फत संगोपन केले जाणार आहे. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या महासभेत जैवविविधता नियंत्रण समिती स्थापन करण्यासंदर्भात महासभेत मंजुरी मिळाली आहे.शासनाच्या जैवविविधता अधिनियम २००८ नुसार अशाप्रकारे समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेला संबंधित समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे संबंधित समितीची स्थापना लांबणीवर पडली होती. निवडणुकीनंतर पहिल्याच महासभेत हा विषय सभागृहासमोर आल्यावर या समितीच्या स्थापनेला सदस्यांनी हिरवा कंदील दिला. या समितीत सात नगरसेवक असणार आहेत. समितीचे अध्यक्षपद महापौरांकडे असणार आहे. तर आमदार, खासदार निमंत्रित सदस्य म्हणून या समितीत काम पाहणार आहेत. विशेष म्हणजे, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये आयुर्वेदाचार्य, पक्षितज्ज्ञ, प्राणितज्ज्ञ या व्यतिरिक्त कृषी अधिकारी, वनविभागाचे अधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत. पालिका क्षेत्रातील दुर्मीळ वनस्पती, प्राणी, भाताच्या जाती, मॅन्ग्रोस आदीसह सर्वप्रकारच्या जैवविविधता असलेल्या घटकांचे संगोपनाचे काम ही समिती पाहणार आहे. समितीचे सचिव म्हणून उपायुक्त संजय शिंदे हे काम पाहणार आहेत. यासंदर्भात शिंदे यांनी जैवविविधता समितीच्या कामाची पद्धत व कार्याची माहिती महासभेत उपस्थित नगरसेवकांना दिली. पनवेल शहर पूर्वीपासूनच जैवविविधता तसेच निसर्गाचे वरदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे या समितीच्या माध्यमातून शहरातील जैवविविधतेचे संगोपन होणार आहे. यासंदर्भात पालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या वनस्पती, प्राणी, भातशेती, पक्षी, वन्यजीव आदीच्या सर्वेक्षणाला लवकरात लवकर सुरु वात होणार आहे.यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर वर्तकनगर या ठिकाणी सुमारे २७ एकरवर उभारण्यात आलेल्या बायोडायव्हर्सिटी गार्डनची उभारणी करण्याचा मानस पनवेल महानगरपालिकेचा असणार आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाने उपयुक्त संजय शिंदे यांच्यावर ही जबाबदारी आहे.समितीत कोण कोण असणारया समितीत सात नगरसेवक असणार आहेत. समितीचे अध्यक्षपद महापौरांकडे असणार आहे. तर स्थानिक आमदार, खासदार निमंत्रित सदस्य म्हणून या समितीत काम पाहणार आहेत. विशेष म्हणजे, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये आयुर्वेदाचार्य, पक्षितज्ज्ञ, प्राणितज्ज्ञ या व्यतिरिक्त कृषी अधिकारी, वनविभागाचे अधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत.पालिका क्षेत्रातील दुर्मीळ वनस्पती, प्राणी, भाताच्या जाती, मॅन्ग्रोस आदीसह सर्वप्रकारच्या जैवविविधता असलेल्या घटकांचे संगोपनाचे काम ही समिती पाहणार आहे. उपायुक्त संजय शिंदे यांच्याकडे या समितीची सचिवपदाची जबाबदारी असणार आहे.दुर्मीळ पक्षी, प्राणी, वनस्पतीची ओळख नागरिकांना होणारआपण ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती, पक्षी, प्राणी,भातशेती, कीटकनाशक आढळतात, याबाबत अनेक पर्यावरणतज्ज्ञांना कुतूहल असते.यासंदर्भात या समितीद्वारे पालिका क्षेत्राचे सर्वेक्षण करून या घटकांची माहिती एकत्रित केली जाणार आहे. दुर्मीळ घटकांच्या संवर्धनासाठी या समितीचे कामकाज चालणार आहे.विकास करत असताना जैवविविधतेमधील सर्व घटकांचा समतोल राखणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने संबंधित समितीद्वारे पालिका क्षेत्रातील विविध घटकांचे संगोपन केले जाणार आहे. समिती नुकतीच स्थापन झाली आहे. प्रत्यक्ष कामालादेखील लवकरच सुरु वात होणार आहे.- संजय शिंदे, सचिव, जैवविविधता नियंत्रण समिती27 एकरवर उभारण्यात आलेल्या बायोडायव्हर्सिटी गार्डनची उभारणी करण्याचा पनवेल महानगरपालिकेचा मानस

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका