शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

गाडीत लाल दिवा बाळगणं; वाहनचालकाला पडले महागात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 16:11 IST

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी वाहनाची नोंदणी निलंबित करण्याचे पत्र दिले आहे. 

ठळक मुद्देखारघर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना लाल दिव्याचा धाक दाखविणाऱ्या वाहन चालकावर खारघर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याच्या हेतूने आम्ही वाहनांची चौकशी करत आहोत.

वैभव गायकर 

पनवेल - गाडीत लाल दिवा ठेवून समाजात आपले वेगळे प्रस्त निर्माण करण्याचा प्रयत्न एका वाहनचालकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यांनतर देखील पनवेलमध्ये सर्रास गाडीत लाल दिवा बाळगणाऱ्या वाहन चालकाला प्रादेशिक परिवहन विभागाने नोटीस जारी करत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी वाहनाची नोंदणी निलंबित करण्याचे पत्र दिले आहे. 

पनवेल शहरात वाहन क्रमांक एमएच ४६ बी ए ३७५५ या क्रमांकाच्या गाडीत अंबर दिवा व महाराष्ट्र शासनाची पाटी ठेवून फिरत असल्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहे. अंबर दिवा बाळगण्यासंदर्भात नियमावलीत अनेक बदल तर झालेच आहेत. विशेष म्हणजे १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून लोकसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यासंदर्भात पनवेल महानगर पालिकेचे उपायुक्त व पनवेल विधानसभा मतदार संघ आचारसंहिता प्रमुख जमीर लेंगरेकर यांना तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत त्यांनी त्वरित उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील यांना यासंदर्भात माहिती दिली. पाटील यांनी या प्रकाराची दखल घेत संबंधित वाहन क्रमांकाच्या आधारे गाडी मालकाला नोटीस बजावली आहे. मोटर वाहन कायदा १९८८ च्या कलम ५३ मधील तरतुदीनुसार तीन महिन्यांसाठी वाहनाची नोंदणी निलंबित का करू नये ? यासंदर्भात गाडी मालकाकडून खुलासा मागितला आहे. संबंधित गाडीचा मालक राठोड नामक व्यक्ती असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी अशीच घटना खारघर शहरात घडली होती. खासदाराच्या नावाखाली खारघर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना लाल दिव्याचा धाक दाखविणाऱ्या वाहन चालकावर खारघर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. 

आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याच्या हेतूने आम्ही वाहनांची चौकशी करत आहोत. आमच्या निदर्शनास आलेल्या दोषींवर आम्ही कारवाई करू अशी प्रतिक्रिया यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.

टॅग्स :panvelपनवेलcarकारElectionनिवडणूक