शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर नेरळ येथे कारला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:14 IST

नेरळ : कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील नेरळ-जिते गावाजवळ स्कोडा कारचा अपघात झाला आहे. वाहनचलकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट रस्त्यालगत ...

नेरळ : कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील नेरळ-जिते गावाजवळ स्कोडा कारचा अपघात झाला आहे. वाहनचलकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट रस्त्यालगत असणाऱ्या नैसर्गिक नाल्याच्या सुरक्षा कठड्यावरून खड्डयात पडले. सुदैवाने या अपघातात वाहनचालक थोडक्यात बचावला असून, वाहनचालकाने स्वतः नेरळ पोलीस ठाण्यात हजर राहून अपघाताची माहिती दिली आहे. बुधवारी मध्यरात्री हा अपघात घडला आहे. 

कर्जतहून अंबरनाथच्या दिशेने निघालेल्या या वाहनचालकाचा बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास नेरळ-जिते गाव येथील वळणावर अचानक ताबा सुटला. कार वेगात असल्याने रस्त्यालगत असणाऱ्या नैसर्गिक नाल्याच्या साईड कठड्यावर कार जाऊन आदळल्याने ती नाल्याच्या बाजूला उलट्या अवस्थेत पडली आहे. दैव बलवत्तर आणि गाडीतील एअर बॅग उघडल्याने वाहनचालक थोडक्यात बचावला. यावेळी वाहनचालकासोबत कोणी नसल्याने चालकाने नेरळ पोलीस ठाणे गाठून अपघाताची माहिती दिली.प्रथमदर्शनी हा अपघात वाहनाचा टायर फुटल्याने झाल्याचा अंदाज वर्तविला जात असून, वाहनचालक वेगात असल्याने चालकाला

वाहनावरील ताबा मिळवता न आल्याने अपघात घडला. कर्जत-कल्याण हा राज्यमार्ग वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असून, दोन महिन्यांत राज्य मार्गावर जवळपास २०  अपघात झाले आहेत. यामध्ये वाहनाचा समोरासमोर अपघात तसेच वाहनांची पादचारी व्यक्तींना मागून ठोकर, तर वाहनाला अचानक लागलेल्या आगीच्या घटना समोर आल्या आहेत. या राज्य मार्गावर अपुऱ्या सुविधा तसेच काही सूचना फलकांच्या अभावामुळे अपघात घडत आहेत. आतापर्यंत कर्जत-कल्याण राज्यमार्गवर नेरळ ते डिकसळ भागात दोन तरुणांना अपघातात आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. 

टॅग्स :Accidentअपघात