शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गुजरातमधील ‘वसंतोत्सव’मध्ये गाजले ‘कैपतनृत्य’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 00:18 IST

गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये नुकताच ‘वसंतोत्सव’ हा सांस्कृतिक महोत्सव पार पडला

नवी मुंबई : गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये नुकताच ‘वसंतोत्सव’ हा सांस्कृतिक महोत्सव पार पडला असून त्यामध्ये मुंबई, नवी मुंबई परिसरातील ‘कैपतनृत्य’ ही लोककला चांगलीच गाजली. गुजरात राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने पार पडलेल्या या उत्सवामध्ये देशभरातील राज्यांतील लोककला सादर करण्यात आल्या.गुजरातचा क्रीडा व सांस्कृतिक विभाग आणि क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वसंतोत्सवाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. २५ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान सुरू असलेल्या लोककला महोत्सवामध्ये मुंबईच्या ‘कैपतनृत्य’ने वाहवा मिळविली. यापूर्वी २००८ मध्ये पार पडलेल्या वसंतोत्सवामध्येही हे नृत्य सादर करण्यात आले होते.‘कैपतनृत्य’ म्हणजे ‘गजनृत्य’. ही लोककला गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई, नवी मुंबई परिसरात जपली जात असून विदेशातही गेली होती. तशी ही लोककला मूळची आरेवाडी (जि. सांगली) येथील असून, दैवत बिरोबाच्या भक्ती आणि सेवेसाठी सादर केली जाते. यामध्ये ढोल, कैताळ व बासरी या वाद्यांसह नृत्य करणारे रंगबिरंगी कपड्यांसह फेटा बांधून पारंपरिक नृत्य सादर करतात.गुजरातधील गांधीनगर येथील संस्कृतीकुंज या निसर्गरम्य ठिकाणी हा महोत्सव पार पडला. याप्रसंगी महाराष्टÑातील कैपतनृत्यासह पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान, आसाम, बिहार, छत्तीसगड आदी राज्यातील विविध लोककला सादर करण्यात आल्याचे विकास कोळेकर यांनी सांगितले. ढोलाच्या तालावर सादर करण्यात आलेल्या ‘कैपतनृत्या’ने गुजरातवासीयांची मने जिंकली.।विविध मान्यवरांसमोरसादर झाली लोकनृत्यकलाकैपतनृत्याला शेकडो वर्षांची परंपरा असून रिमिक्सच्या जमान्यातही हे पारंपरिक नृत्य जपले जात आहे. हे लोकनृत्य २००१ मध्ये इग्लंड व २००९ मध्ये रशियामध्ये सादर करण्यात आले आहे. देशभरात पार पडलेल्या विविध लोककला महोत्सवप्रसंगी ही लोककला सादर करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान पं. नेहरू, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी व नरेंद्र मोदी या महोदयांनी पाहिली आहे. तसेच राष्टÑपती शंकर दयाळ शर्मा, ए. पी. जे. अब्दुल कलाम व प्रतिभा पाटील आदी राष्टÑपती महोदयांनीही या कलेचा आस्वाद घेतला आहे.