शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांच्या संस्थेला दिलेला भूखंड रद्द, सिडकोचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 05:24 IST

महाराष्ट्र सदन बांधकामातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट संस्थेला सानपाडा येथे केलेले भूखंड वाटप सिडकोने रद्द केले आहे. निर्धारित वेळेत बांधकाम न केल्याने नियमाचा आधार घेत, ही कारवाई करण्यात आल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सांगितले.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई  - महाराष्ट्र सदन बांधकामातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट संस्थेला सानपाडा येथे केलेले भूखंड वाटप सिडकोने रद्द केले आहे. निर्धारित वेळेत बांधकाम न केल्याने नियमाचा आधार घेत, ही कारवाई करण्यात आल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सांगितले.सिडकोने भुजबळ यांच्या शिक्षण संस्थेला शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय उभारण्यासाठी सानपाडा सेक्टर १५ येथे ३,४९१ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ६५ लाख ४६ हजार ६२३ रुपये या नाममात्र किमतीत दिला होता. या भूखंडाचा करार १८ आॅक्टोबर २00३ रोजी करण्यात आला होता. करारातील अटी व शर्तीनुसार निर्धारित वेळेत बांधकाम परवानगी घेऊन प्रत्यक्ष काम सुरू करणे गरजेचे होते, परंतु संस्थेकडून आजतागायत बांधकाम परवानगीच घेतली नसल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, या संस्थेला बांधकाम परवानगी घेण्यासाठी मुदतवाढही दिली होती. मात्र, त्यानंतरही संस्थेकडून कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सिडकोकडून या संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, परंतु या नोटिसीला संस्थेकडून समानधानकारक उत्तर न मिळाल्याने सिडकोने हे भूखंड वाटप रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, गेल्या आठवड्यात त्यावर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली आहे. करारमुक्त झालेला हा भूखंड सिडकोने आता विक्रीसाठी काढला आहे. त्यासंबंधीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, सवलतीच्या दरात भूखंड घेऊन वर्षानुवर्षे त्यावर बांधकाम न करणाºया अन्य सामाजिक व शैक्षणिक संस्थांवरही येत्या काळात धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे गगराणी यांनी सांगितले. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNavi Mumbaiनवी मुंबई