शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये १३ हजार परवाने रद्द, परिवहन विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 03:54 IST

वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहनचालकांविरोधात परिवहन विभागाने कडक धोरण राबविण्यास सुरु वात केली आहे.

पनवेल  - वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहनचालकांविरोधात परिवहन विभागाने कडक धोरण राबविण्यास सुरु वात केली आहे. दोन महिन्यांत सुमारे १३ हजार चालकांचे परवाने रद्द केल्याची माहिती राज्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी कळंबोलीत शुक्रवारी पार पडलेल्या ३० व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमप्रसंगी दिली.राज्यात ३० वर्षांपासून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. प्रत्येक वर्षी आम्ही वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करतो. अपघातांची संख्या कमी करण्याचा आमचा उद्देश असला तरी गेल्या काही वर्षांत अपघातांचे प्रमाण चार टक्क्यांनी वाढल्याचे चन्ने यांनी सांगितले. सिग्नल तोडणे, मद्यपान करून वाहन चालवणे, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे यासारख्या विविध गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. कारवाईत ९० दिवसापर्यंत परवाने रद्द करण्यात आले आहेत. रस्ते अपघाताचा परिणाम देशाच्या जीडीपीवर होतो. अपघातांमुळे देशाचा तीन टक्के जीडीपी दर कमी होत असल्याचे चन्ने यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाला वाहतूक नियमांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची विनंती परिवहन विभागाने केली आहे.कळंबोली येथील अभियानात अभिनेते वैभव मांगले यांनीदेखील वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन सर्वांना केले. सध्याच्या घडीला सामाजिक भान हा महत्त्वाचा घटक आहे. पालक जेव्हा दुचाकी किंवा कारने पाल्याला शाळेत सोडायला येतात, तेव्हा त्यांनी हेल्मेट व सीटबेल्ट लावणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलांवर नकळत संस्कार होतात. ज्याप्रमाणे आपण घराची निगा राखतो, तशीच पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे, असे मार्गदर्शन मांगले यांनी केले.कळंबोली येथील सुधागड हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्र माला वाहतूक पोलिसांसह विविध सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.यामध्ये पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, नवी मुंबई वाहतूक उपायुक्त सुनील लोखंडे आदी उपस्थित होते.अबोली रिक्षा व बाईक रॅलीकळंबोलीतील जनजागृती अभियानाचा भाग म्हणून कळंबोली सुधागड हायस्कूल या ठिकाणाहून ४० पेक्षा जास्त अबोली रिक्षाचालक महिला व दुचाकी रॅली या वेळी काढण्यात आली. हेल्मेट जनजागृती व वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी