शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

मराठा आरक्षणासाठी आज नवी मुंबई बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 03:06 IST

बंदच्या दरम्यान अत्यावश्यक सुविधांची गैरसोय होणार नाही या उद्देशाने शहरातील रुग्णालये, शाळा-महाविद्यालये तसेच भाजी मार्केटला वगळण्यात आले आहे.

नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसह वाहतूकदारांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी नवी मुंबई बंदची घोषणा करण्यात आली आहे. मराठा समन्वय समितीचे पदाधिकारी व माथाडी नेते यांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, बंदच्या दरम्यान अत्यावश्यक सुविधांची गैरसोय होणार नाही या उद्देशाने शहरातील रुग्णालये, शाळा-महाविद्यालये तसेच भाजी मार्केटला वगळण्यात आले आहे.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलने होत आहेत. अशातच सोमवारी औरंगाबाद येथे मोर्चादरम्यान काकासाहेब शिंदे या मराठा आंदोलकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटू लागले असून, अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. तर मंगळवारी राज्याच्या अनेक भागात बंद पुकारल्यानंतर बुधवारी मुंबईसह नवी मुंबईत कडकडीत बंद पाळला जाणार आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी एपीएमसी येथे मराठा समन्वय समितीसह माथाडी नेते, कामगार यांच्यात बैठक झाली. त्यास आमदार नरेंद्र पाटील, प्राना फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, मराठा समन्वय समितीचे अंकुश कदम, मोहन पाडळे, सूरज बर्गे, नीलेश मोरवे, विजय खोपडे, जितेंद्र येवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या बैठकीत बुधवार, २५ जुलै रोजी नवी मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय सर्वमताने घेण्यात आला. हा बंद मराठा आरक्षणाच्या मागणीसह मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतूकदारांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी केला जाणार असल्याचे आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले. तर बैठकीदरम्यान कै. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या मृत्यूला सरकारला जबाबदार धरण्यात आले. मात्र, बंदमधून शाळा, महाविद्यालये यासह भाजी मार्केट व रुग्णालये अशा अत्यावश्यक सुविधांना वगळण्यात आले आहे.अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी सरकार गांभीर्याने घेत नसल्याने राज्यभर आंदोलने होत आहेत. त्यानंतरही केवळ आरक्षणाचे पोकळ आश्वासन देऊन समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करत आहे. यामुळे जनतेमध्ये सरकारविषयी तेढ निर्माण झालेली असून, आरक्षणाच्या मागणीकरिता निघणाऱ्या आंदोलनामधून ती उमटत आहे. परंतु नवी मुंबईत आंदोलनाला हिंसक वळण लागणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.त्यानुसार पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्त लावला जाणार आहे. शहरातील महत्त्वाचे चौक, रेल्वे स्थानके, बस डेपो याठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त लावला जाणार आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNavi Mumbaiनवी मुंबई