शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सोडतीदरम्यान सिडकोत रंगले मानापमान नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 03:13 IST

निमंत्रणाचा वाद : विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाठ; युनियनच्या पदाधिकाऱ्यांचीही दांडी

कमलाकर कांबळे

नवी मुंबई : सिडकोच्या मेगागृहप्रकल्पाची मंगळवारी सोडत संपन्न झाली, त्यासाठी सिडकोने प्रथमच सगंणकीय प्रणालीचा अवलंब केला. सोडतीची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली असली, तरी कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून मात्र सिडकोत वेगळेच नाट्य रंगले आहे. याचा परिणाम म्हणून सिडकोच्या अनेक वरिष्ठ अधिकाºयांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. सिडकोच्या इतिहासात असा मानापमानाचा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने अधिकारी वर्गात तर्क-वितर्क लावले जात आहेत.

सिडकोच्या माध्यमातून आर्थिक व अल्प उत्पन्न गटासाठी १४ हजार ८३८ घरांचे काम सुरू करण्यात आले आहे. या योजनेतील घरांसाठी मंगळवारी सिडको भवनमध्ये सोडत काढण्यात आली. या सोडतीची संपूर्ण जबाबदारी पणन विभागाची होती; परंतु या विभागाच्या ‘एकला चलो रे’ भूमिकेचा फटका कार्यक्रमाच्या नियोजनाला बसला. ज्या विभागाचा कार्यक्रम असेल, त्या विभागाकडून संबंधित व इतर विभाग अधिकाºयांना निमंत्रण देणे ही सिडकोची आजपर्यंतची परंपरा आहे; परंतु मंगळवारच्या कार्यक्रमाने या परंपरेला छेद दिल्याचे दिसून आले आहे. पणन विभागाकडून कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत एकाही वरिष्ठ अधिकाºयाला निमंत्रण दिले गेले नाही. इतकेच नव्हे, तर या गृहप्रकल्पाशी संबंधित नियोजन आणि अभियंता विभागालाही विश्वासात घेतले गेले नसल्याचे समजते. याचा परिणाम म्हणून मोठा गाजावाजा झालेल्या या गृहप्रकल्पाच्या सोडतीला वरिष्ठ अधिकाºयांनी अनुपस्थिती दर्शविली. तसेच युनियनचे पदाधिकारीही गैरहजर राहिले होते. विशेष म्हणजे, मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर, सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे यांनीही कार्यक्रमाला येणे टाळले. खासदार व स्थानिक आमदारांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याचा सिडकोत पायंडा आहे. मात्र, त्यालाही या वेळी खो दिल्याचे दिसून आले आहे.व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुखांना विश्वासत घेवूनच कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. कार्यक्रमाची जबाबदारी पणन आणि जनसंपर्क विभागावर होती. त्यानुसार अगदी नियोजनबध्द पध्दतीने सोडत प्रक्रिया पार पडली.- लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक, सिडकोजनसंपर्क विभागाच्या मर्यादाया कार्यक्रमाच्या माध्यमातून सिडकोच्या जनसंपर्क विभागाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. विविध टप्प्यावर या विभागाचा अनुभव कमी पडत असल्याचे पाहावयास मिळाले. वास्तविकपणे बाह्य पाहुण्यांना निमंत्रित करण्याची जबाबदारी जनसंपर्क विभागाची असते. शिवाय, कार्यक्रमाच्या वेळी पाहुण्यांचे चहापान आणि इतर सुविधा पुरविण्याचे कामही जनसंपर्क विभागामार्फत होते. प्रोटोकॉल जपण्याची मोठी जबाबदारी या विभागाला हाताळावी लागते. दुर्दैवाने मंगळवारच्या सोडती दरम्यान, या सर्व गोष्टींचा प्रकर्षाने अभाव जाणवला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई