शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पावणेदोन लाख प्रवाशांना बसच आधार, ३६२ एनएमएमटी धावत आहेत रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 00:20 IST

NMMT : सुरुवातीच्या काळात प्रतिदिन १० हजार कर्मचाऱ्यांना सेवा दिली जात होती. सर्व कार्यालये सुरू झाल्यानंतर ६ जूनपासून सर्व कर्मचाऱ्यांना एनएमएमटीचाच आधार मिळत आहेत.

-   नामदेव मोरे

नवी मुंबई : रेल्वे बंद असल्यामुळे नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिकांसाठी प्रवाशांना एनएमएमटीचाच आधार भेटू लागला आहे. प्रतिदिन पावणेदोन लाख नागरिकांना उपक्रमाच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे. कमी प्रवासी घेऊन जावे लागत असल्याने उपक्रमाचा तोटा वाढत असतानाही जास्तीतजास्त बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध देण्यासाठी एनएमएमटी व्यवस्थापन प्रयत्न करत आहे. रेल्वेसेवा बंद असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुंबई, ठाणे, पनवेल व नवी मुंबईमधील विविध शासकीय कार्यालय, रुग्णालयात पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नव्हती. त्यावेळी एनएमएमटीने कोरोना योद्ध्यांसाठी बसेस उपलब्ध करून दिल्या.

सुरुवातीच्या काळात प्रतिदिन १० हजार कर्मचाऱ्यांना सेवा दिली जात होती. सर्व कार्यालये सुरू झाल्यानंतर ६ जूनपासून सर्व कर्मचाऱ्यांना एनएमएमटीचाच आधार मिळत आहेत. उपक्रमाच्या ३६२ बसेस नवी मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, पनवेल, उरण, मुंबई व इतर परिसरात सेवा पुरवत आहेत. शासनाने सुरक्षित अंतर ठेवून व गर्दी नियंत्रणात ठेवून सेवा पुरविण्यास परवानगी दिली आहे. ही सेवा देताना उपक्रमाचे जवळपास ५० टक्के नुकसान होत आहे.

कोरोनाच्या पूर्वी एनएमएमटीला प्रतिदिन ४० लाख रुपये उत्पन्न हाेत होते. ते २२ लाखांवर आले आहे. मासिक तोटा ६ कोटींवरून ८ कोटीवर पोहोचला असून, यानंतरही उपक्रमाने प्रवाशांच्या सुविधेसाठी नियमित सेवा सुरू ठेवली आहे.रुग्णांसाठी ३७ बसेस उपलब्ध करून दिल्या असून, रुग्णवाहिकेची कमतरता दूर झाली आहे. रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी व इतर सुविधांसाठी या बसेसचा वापर केला जात आहे. रुग्णांसाठी एनएमएमटी जीवनवाहिनी ठरली आहे.

मजुरांनाही दिला होता आधारलॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी निवासस्थानापासून पोलीस व रेल्वे स्टेशनपर्यंत एनएमएमटीने विशेष सेवा पुरविली होती. तब्बल ३९ हजार ७४६ मजुरांना या काळात सुविधा दिली होती. यासाठी जवळपास एक हजार फेऱ्या मारल्या होत्या. राज्यातील स्थलांतरित मजुरांसाठीही २५ बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जास्तीतजास्त प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. सुरुवातीस अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व आता सर्व प्रवाशांना सेवा पुरवितानाच कोरोना रुग्णांसाठी बसेसच रुग्णवाहिकेतही रूपांतर करण्यात आले आहे.- शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई